IND vs NZ | सुमार कामगिरी की दुखापत, लोकल बॉय रहाणेच्या डच्चूमागील कारण काय?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी दोन्ही संघांसाठी वाईट बातम्या आल्या आहेत. भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी दोन्ही संघांसाठी वाईट बातम्या आल्या आहेत. भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याचवेळी जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायांचे स्नायू दुखावले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनदेखील या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या कोपराला झालेली दुखापत. (Bad form or Injury, Why Ajinkya Rahane dropped for Playing 11, India vs New Zealand Mumbai Test)
लोकल बॉय अजिंक्य रहाणे ‘पहिल्या’ सामन्याला मुकणार
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने भारतीय संघाचं आतापर्यंत 79 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र या संपूर्ण कारकिर्दीत अजिंक्यला कधीही त्याचं होम ग्राऊंड असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळाली नाही. आज अजिंक्यला त्याच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार होती. मात्र दुखापतीमुळे ती हिरावली आहे.
NEWS – Injury updates – New Zealand’s Tour of India
Ishant Sharma, Ajinkya Rahane and Ravindra Jadeja ruled out of the 2nd Test.
More details here – https://t.co/ui9RXK1Vux #INDvNZ pic.twitter.com/qdWDPp0MIz
— BCCI (@BCCI) December 3, 2021
सुमार कामगिरी की दुखापत, डच्चूमागील कारण काय?
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म गेल्या वर्षभरापासून कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याची बॅट शांतच राहिली. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात तो 35 धावा करुन बाद झाला तर दुसऱ्य डावात त्याला अवघ्या 4 धावांचं योगदान देता आलं. डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ajinkya Rahane has played 79 Tests for India but is yet to play on his home turf at the Wankhede Stadium.?
Will He get The Opportunity to Break it Tommorow ? ? pic.twitter.com/G9peVFkAZP
— Ajinkya Rahane Fanclub (@AjinkyaRahane13) December 2, 2021
अजिंक्य रहाणेने 2021 मध्ये 12 कसोटी सामने खेळले असून 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत त्याला केवळ दोनच अर्धशतकं झळकावता आली आहेत. 67 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या पाचमध्ये क्रमांकांवर खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये ही एका कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट धावांची सरासरी आहे. एका कॅलेंडर वर्षात अॅलन लँबच्या नावावर त्याच्यापेक्षा वाईट सरासरीचा विक्रम आहे. 1986 मध्ये त्याने 12 कसोटीत 19.33 च्या सरासरीने 406 धावा केल्या होत्या. तसेच यापूर्वी कधीही कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेची धावांची सरासरी 30 च्या खाली गेली नव्हती, परंतु यावर्षी ती 20 पेक्षा कमी आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याची सरासरी 2013 मध्ये 43.40, 2014 मध्ये 44.94, 2015 मध्ये 45.61, 2016 मध्ये 54.41, 2017 मध्ये 34.62, 2018 मध्ये 30.66, 2019 मध्ये 71.33, 2020 मध्ये 38.85 आणि 2021 – 19.57 इतकी राहिली आहे.
BCCI: Ajinkya Rahane is injured.
Ajinkya: But I’m not.
BCCI: pic.twitter.com/ARX7mBOfKY
— Shridhar V (@iimcomic) December 3, 2021
अजिंक्य रहाणे वर्षभरापासून फ्लॉप ठरतोय, त्यामुळे त्याला या सामन्यात डच्चू दिला आहे, असा सूर सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. पायाच्या स्नायूला दुखापात झाल्याने अजिंक्यला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे, असे बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र काही क्रिकेटरसिकांच्या मते अजिंक्यला त्याच्या सुमार कामगिरीमुळे संघातून वगळलं आहे.
Indian fans watching Ajinkya Rahane left out for this test match bcz of “Injury”: pic.twitter.com/z7bpVkYgCC
— Abhishek Tripathi (@abhithecomic) December 3, 2021
खराब सरासरी
2021 मध्ये खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेचे कसोटीतील आकडे खूपच खालावले आहेत. भारतासाठी 75 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वात वाईट आहे. रहाणेने 79 कसोटीत 39.30 च्या सरासरीने 4795 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. रहाणे वगळता, 75 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या भारताच्या एकाही फलंदाजाची सरासरी 40 पेक्षा कमी नाही. अशा स्थितीत रहाणे टीम इंडियातून जवळपास बाहेर फेकला गेला असल्याचे मानले जात आहे.
Ajinkya Rahane is out due to injury. Me to BCCI- pic.twitter.com/WLKBwM3k2k
— Positive Entropy (@EntropyPositive) December 3, 2021
What team management indirectly said to Ajinkya Rahane: pic.twitter.com/8IQGlaPaZE
— Abhishek Tripathi (@abhithecomic) December 3, 2021
इतर बातम्या
IND vs NZ : पहिली टेस्ट ड्रॉ, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट, टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
(Bad form or Injury, Why Ajinkya Rahane dropped for Playing 11, India vs New Zealand Mumbai Test)