VIDEO – याला म्हणतात नशीब, लास्ट ओव्हरचा थरार, बॉल स्टम्पला लागला, पण….

लास्ट ओव्हरमध्ये कॅटरबरीने वेलिंग्टनवर एक चेंडू राखून विजय मिळवला. लास्ट ओव्हरमध्ये जे पहायला मिळालं, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. नाथन स्मिथ लास्ट ओव्हर टाकत होता.

VIDEO - याला म्हणतात नशीब, लास्ट ओव्हरचा थरार, बॉल स्टम्पला लागला, पण....
super smashImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 2:57 PM

वेलिंग्टन – न्यूझीलंडमध्ये सुपर स्मॅश टुर्नामेंट सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये सोमवारी एक वेगळच दृश्य दिसलं. त्यामुळे फॅन्स चक्रावून गेले आहेत. कॅटरबरी आणि वेलिंग्टनमध्ये सामना होता. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचला. लास्ट ओव्हरमध्ये कॅटरबरीने वेलिंग्टनवर एक चेंडू राखून विजय मिळवला. लास्ट ओव्हरमध्ये जे पहायला मिळालं, त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. नाथन स्मिथ लास्ट ओव्हर टाकत होता. कॅम फ्लेचर स्ट्राइकवर होता. स्मिथचा चेंडू स्टम्पसला लागला पण फ्लेचर बोल्ड झाला नाही. उलट टीमला चार रन्स मिळाले व त्यांचा संघही जिंकला.

कोणी जिंकला सामना?

हे सुद्धा वाचा

या मॅचमध्ये वेलिंग्टनच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅटबरीच्या टीमने 19.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. कॅटबरीने हा सामना नशिबाने जिंकला.

View this post on Instagram

A post shared by Spark Sport (@sparknzsport)

चेंडू स्टम्पला लागूनही बाऊंड्री

वेलिंग्टनचा बॉलर नाथन स्मिथला लास्ट ओव्हरमध्ये 9 रन्स वाचवायच्या होत्या. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर फक्त एक धाव दिली. कॅटरबरीला शेवटच्या चार चेंडूंवर 8 धावांची आवश्यकता होती. स्मिथने तिसरा बॉल कमालीचा टाकला. स्मिथच्या यॉर्कर चेंडूवर फ्लेचरने स्कूप करण्याचा प्रयत्न केला. पण फ्लेचर त्यात यशस्वी ठरला नाही. चेंडू स्टम्पला लागला. चेंडू स्टम्पसला लागूनही बेल्स खाली पडल्या नाहीत. फक्त चेंडू फाइन लेगच्या दिशेने बाऊंड्री पार गेला. कॅटरबरीला नशिबाची साथ मिळाली. त्यांनी एक चेंडू बाकी राखून विजय मिळवला. टॉम ब्लंडेलची इनिंग वाया

वेलिंग्टनचा विकेटकीपर टॉम ब्लंडेल मॅचमध्ये चांगली इनिंग खेळला. त्याने 49 चेंडूत 70 धावा फटकावल्या. मात्र, तरीही त्यांची टीम हरली. फॉलक्सने 32 धावा केल्या. या विजयासह कॅटरबरीची टीम 7 सामन्यात चार विजयासह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. वेलिंग्टनची टीम 8 मॅचमध्ये 14 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.