Team India | टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कुणाकडे?
Bcci Indian Cricket Team | बीसीसीआयने टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 2 टेस्ट आणि 3 वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा 23 जून रोजी केली आहे. कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टी 20 मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र त्याआधी या टी 20 सारिजमध्ये हार्दिक पंड्या कॅप्टनसी करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच या सीरिजमध्ये युवा खेळाडूंनासंधी देण्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाचा बांगालदेश दौरा
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याआधी बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्यााठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वूमन्स टीम इंडिया जुलै महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यात प्रत्येकी 3-3 वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 9 जूलैपासून टी 20 मालिकेने होणार आहे. तर 22 जुलैला वनडे सीरिजने दौऱ्याची सांगता होणार आहे.
कर्णधारपदाची जबाबदारी कोणाला?
वनडे आणि टी 20 या दोन्ही मालिकांमध्ये हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उमा चेत्री, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी या चौघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.
बांगलादेश दौऱ्याासाठी वूमन्स टीम इंडिया जाहीर
India name a host of new faces in their limited-overs squad for the Bangladesh series ?#BANvINDhttps://t.co/sxEkoCjBvv
— ICC (@ICC) July 2, 2023
एकाच स्टेडियममध्ये दोन्ही मालिकांचं आयोजन
या दोन्ही मालिकेतील एकूण 6 सामन्यांचं आयोजन हे शेरे बांगला स्टेडियम, ढाका इथे करण्यात आलं आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 9 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
दुसरा सामना, मंगळवार 11 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
तिसरा सामना, गुरुवार 13 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, रविवार 16 जुलै, सकाळी 9 वाजता.
दुसरी वनडे, बुधवार 19 जुलै, सकाळी 9 वाजता.
तिसरी वनडे, शनिवार 22 जुलै, सकाळी 9 वाजता.
बांगलादेश विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य,अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी.
बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (सी), स्मृती मानधना (व्हीसी), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवाणी, मोनिका पटेल, स्नेह राणा, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया आणि अनुषा बरेड्डी.