BAN vs SL | नजमूल शांतो याने लाज राखली, श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Bangladesh vs Sri Lanka Asia Cup 2023 | श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथीराणा याच्या धारदार आणि भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा डब्बा गुल झाला. बांगलादेशला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही.

BAN vs SL | नजमूल शांतो याने लाज राखली, श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:18 PM

कोलंबो | श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर बांगलादेश क्रिकेट टीमने शरणागती पत्कारली आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या बांगलादेशची श्रीलंकेसमोर घसरगुंडी झाली आहे. बांगलादेशला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 42.4 ओव्हरमध्येचं गुंडाळलं. बांगलादेशला फक्त 164 धावा करता आल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला आशिया कप 2023 मधील विजयी सुरुवात करण्यासाठी 165 धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे आता श्रीलंका हा सामना जिंकून विजयी सुरुवात करते की बांगलादेश यशस्वीरित्या या धावांचं बचाव करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

बांगलादेशकडून नजमूल शांतो याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. नजमूलने 122 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. नजमूलच्या या खेळीने बांगलादेशची लाज राखली, त्यामुळेच बांगलादेशला 100 धावांचा टप्पा पार करता आला. नजमूल व्यतिरिक्त मोहम्मद नईम आणि तॉहिद हृदाय आणि मुशफिकूर रहिम या तिघांनी दुहेरी आकडा गाठला. नईमने 16, हृदॉयने 20 आणि रहिने 13 धावा केल्या. दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर शोरिफूल इस्लाम हा 2 धावांवर नाबाद राहिला.

हे सुद्धा वाचा

श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान

श्रींलेककडून मथीखा पथीराणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पथीराणा याने 4.20 च्या इकॉनॉमीने 32 धावांच्या मोबदल्यात 4 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. महीश तीक्षणा याने 2 विकेट्स घेतल्या. तर धनंजया डी सीलव्हा, दुनिथ वेललागे आणि कॅप्टन दासून शनाका या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.