Shakib Al Hasan | जोरदार एंट्री दमदार रेकॉर्ड, शाकिब अल हसनचा विश्वविक्रम

शाकिब अल हसनने (Shakib al hasan) वेस्टइंडिजविरोधातील तिसऱ्या सामन्यात 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Shakib Al Hasan | जोरदार एंट्री दमदार रेकॉर्ड, शाकिब अल हसनचा विश्वविक्रम
शाकिब अल हसन
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 11:03 AM

ढाका | बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Bangladesh vs West Indies 3rd ODI) वेस्टइंडिजवर 120 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह बांगलादेशने 3-0  अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 297 धावा केल्या. यामुळे विंडिजला 298 धावांचे आव्हान मिळाले. पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी विंडिजचा डाव 177 धावांवर गुंडाळला. यामुळे बांगलादेशचा 120 धावांनी विजय झाला. या सामन्यातून बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib al hasan) आयसीसीच्या (ICC) निलंबनानंतर पुनरागमन केलं. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. यासह शाकिबने विश्वविक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. (ban vs wi 3rd odi shakib al hasan become first player who scored 6 thousand run and 300 wickets for bangladesh team)

काय आहे विश्वविक्रम?

शाकिबने विश्व विक्रम केला आहे. एका संघाकडून खेळताना कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये 6 हजार धावा आणि 300 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. अशी धडाकेबाज कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. शाकिबवर आयसीसीने 1 वर्षाची निलंबनाची कारवाई केली होती. आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान या एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेआधी 29-31 जानेवारीदरम्यान सराव सामना खेळण्यात येणार आहे. तर यानंतर कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी – 3 ते 7 फेब्रुवारी, झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चॅटोग्राम.

दुसरी कसोटी- 11 ते 15 फेब्रुवार, शेरे बांगला स्टेडियम, ढाका.

संबंधित बातम्या :

तुला कापून टाकेन, वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला ‘लाईव्ह’ धमकी

‘मला विराट कोहलीची विकेट घ्यायचीय’, बांगलादेशची महिला क्रिकेटपटू जहाआरा आलमचं स्वप्न

(ban vs wi 3rd odi shakib al hasan become first player who scored 6 thousand run and 300 wickets for bangladesh team)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.