Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीमची घोषणा, स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी आशिया कप स्पर्धेत आशियाई संघांची परीक्षा असणार आहे. वर्ल्डकपपूर्वी तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा खूपच महत्वाची आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीमची घोषणा, स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेसाठी अखेर संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाला डच्चू Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 4:32 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या संघांची आता घोषणा होत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही शनिवार आशिया कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. शाकिब अल हसन याच्या नेतृत्वात 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तमीम इकबाल याने वनडे संघाचं नेतृत्व सोडल्याने ही जबाबदारी आता शाकिब अल हसन याच्या खांद्यावर देण्यात आलीआहे. तमीम इकबाल दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. दुसरीकडे या संघात अष्टपैलू महामुदुल्लाह याला स्थान मिळालेलं नाही. तसेच तंजीद हसन तमीम याला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळालं आहे. तमीम इकबाल याच्या जागी त्याला संघात स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे. इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत त्यांने चांगली कामगिरी केली होती. तसेच 2020 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

बांगलादेश संघात कोणाला मिळाली संधी?

आशिया कप स्पर्धेत ग्रुप बी मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहे. बांगलादेश आपला पहिला सामना 31 ऑगस्टला कँडीमध्ये श्रीलंके विरुद्ध खेळणार आहे. महामुदुल्लाह आणि तमीम संघात नसल्याने इतर वरिष्ठ खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे. कर्णधार शाकिब, लिटन दास, मुश्फीकुर रहिम यांना मोर्चा सांभाळावा लागणार आहे. यांच्यावर फलंदाजीची धुरा असणार आहे.

बांगलादेश संघात नासुम अहमद, मेहेदी हसन आणि मोहम्मद नईम यांनाही संधी मिळाली आहे. नासुमने बांगलादेशमद्ये आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या मालिकेनंतर कोणतीच वनडे खेळला नाही. मेहेदी हसन याने 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आपली शेवटचा वनडे खेळला होता. त्यालाही या संघात संधी मिळाली आहे. त्याला अष्टपैलू महामुदुल्लाहची जागा मिळू शकते.

बांगलादेश अद्याप एकही आशिया कप जिंकलेला नाही. 2012 मध्ये आशिया कप जिंकण्याच्या वेशीवर होती. पण पाकिस्ताने या सामन्यात विजय खेचून आणला होता. आता शाकिबच्या नेतृत्वात आशिया कप विजयाचे स्वप्न पाहिलं जात आहे.

आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम

शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.