VIDEO : 1 बॉल आणि 16 धावा, फलंदाजाची चौफेर फटकेबाजी, व्हीडिओ व्हायरल

या फलंदाजाने वादळी खेळी करत अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. तर या दरम्यान 1 बॉलमध्ये 16 धावा केल्या.

VIDEO : 1 बॉल आणि 16 धावा, फलंदाजाची चौफेर फटकेबाजी, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 8:07 PM

कॅनबेरा : क्रिकेट विश्वात दररोज विविध रेकॉर्ड होत असतात. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही, त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असंही म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी 20 क्रिकेट लीग सुरु आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने वादळी खेळी केली. स्मिथने होबार्ट हरिकेंस विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. मात्र या अर्धशतकादरम्यान स्मिथने चमत्कार केला. स्मिथने एका बॉलमध्ये तब्बल 16 धावा केल्या. स्मिथने या सामन्यात एकूण 33 बॉलमध्ये 66 धावा केल्या.

1 बॉल 16 रन्स

स्मिथने सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा कारनामा केला. जोएल पेरिस बॉलिग टाकत होता. पेरिसने आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमधील तिसरा बॉलवर नो बॉल टाकला. या बॉलवर स्मिथने स्केवअर लेगच्या दिशेने सिक्स ठोकला. नो बॉल असल्याने स्मिथला फ्री हीट मिळाला. म्हणजे 7 धावा जमा झाल्या.

हे सुद्धा वाचा

यानंतर पेरिस पुढील बॉलवर दिशा भटकला. पेरिसने लेग साईडला वाईड बॉल टाकला जो विकेटकीपही पकडू शकला नाही. त्यामुळे फुकटात 5 धावा मिळाल्या. अशा पद्धतीने 12 धावा झाल्या. तसेच वाईड बॉल असल्याने पुढील बॉलही फ्री हीट होता. या बॉलवर स्मिथने लेग साईडला चौकार ठोकला. अशा पद्धतीने 1 बॉलमध्ये सिडनी सिक्सर्सला 16 धावा मिळाल्या. या 16 पैकी 10 धावा या स्मिथच्या खात्यात जोडल्या गेल्या.

स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी

स्मिथने एकूण 66 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान स्मिथचा स्ट्राईक रेट हा 200 इतका होता. स्मिथ या खेळीसह बिग बॅश लीगच्या सुरु हंगामात सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.

दरम्यान स्टीव्हने या स्पर्धेत याआधी 2 शतकं ठोकलीत. पहिलं शतक त्याने एडिलेड स्ट्राइकर्स विरुद्ध केलं होतं. या खेळीत त्याने 56 बॉलमध्ये 101 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. तर दुसरं शतक हे सिडनी थंडर्स विरुद्ध केलं होतं. स्टीव्हने त्यावेळेस 5 फोर आणि 9 सिक्स ठोकले. स्टीव्हने तेव्हा 125 रन्स केल्या होत्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.