Bcci : 4 संघ आणि 6 सामने, स्पर्धेसाठी टीम जाहीर, पाहा वेळापत्रक
Cricket : बीसीसीआयकडून 25 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 4 संघांची घोषणा केली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या मोसमाकडे (IPL 2025) लागून आहे. आयपीएलच्या या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता पुढील 2 महिने एकूण 10 संघांमध्ये एक ट्रॉफी जिंकण्यसााठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयकडून एकूण 4 संघांमध्ये वूमन्स मल्टी डे चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून संघांची घोषणा करण्यात आली आहे.
सिनिअर वूमन्स मल्टी डे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत एकूण 4 संघात 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 25 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत करण्यात आलं आहे. स्पर्धेतील या 6 सामन्यांचं आयोजन हे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डेहराडून आणि अभिमन्यू क्रिकेट अकादमीत करण्यात आलं आहे.
स्पर्धेचं वेळापत्रक
- टीम ए विरुद्ध टीम बी, 25 ते 27 मार्च
- टीम सी विरुद्ध टीम डी, 25 ते 27 मार्च
- टीम ए विरुद्ध टीम सी, 31 मार्च ते 2 एप्रिल
- टीम बी विरुद्ध टीम डी, 31 मार्च ते 2 एप्रिल
- टीम ए विरुद्ध टीम डी, 6 ते 8 एप्रिल
- टीम बी विरुद्ध टीम सी, 6 ते 8 एप्रिल
बीसीसीआयकडून 4 संघ जाहीर, 25 मार्चपासून सुरुवात
🚨 News 🚨
Squads for Senior Women’s Multi-Day Challenger Trophy announced
Details 🔽https://t.co/d4yQckkifD#SWMultiday #ChallengerTrophy
— BCCI Women (@BCCIWomen) March 22, 2025
टीम ए : रिचा घोष, शिप्रा गिरी, शुभा सतीश, श्वेता सेहरावत , वृंदा दिनेश, मुक्ता मगरे, हेन्रिएटा परेरा, मिन्नू मणी (कर्णधार), तनुजा कंवर, वासवी ए पवानी, प्रिया मिश्रा, अरुंधती रेड्डी (उपकर्णधार), सायली सातघरे, अनादी तागडे आणि प्रगती सिंग.
टीम बी: यास्तिका भाटिया (उपकर्णधार), एम. ममथा, प्रतिका रावल, आयुषी सोनी, हरलीन देओल (कर्णधार) आरुषी गोयल, कनिका आहुजा, मीता पॉल, श्री चरणी, ममता पासवान, प्रेमा रावत, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अक्षरा एस आणि तीतास साधू.
टीम सी: उमा चेत्री, रिया चौधरी, शफाली वर्मा (उपकर्णधार), तृप्ती सिंग, जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), तनुश्री सरकार , तेजल हसबनीस, सुश्री दिव्यदर्शनी, सुची उपाध्या, राजेश्वरी गायकवाड, सरन्या गडवाल, जोशिता व्हीजे, शबनम एमडी, सायमा ठाकोर आणि गरिमा यादव.
टीम डी : नंदिनी कश्यप , शिवांगी यादव, जी त्रिशा, जिन्सी जॉर्ज, राघवी, धारा गुजर, स्नेह राणा (कर्णधार), संस्कृती गुप्ता, यमुना व्ही राणा, वैष्णवी शर्मा, एसबी कीर्थना, अमनजोत कौर (उपकर्णधार) काशवी गौतम, मनाली दक्षिणी आणि मोनिका पटेल.