AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : 4 मालिका आणि 12 सामने, टीम इंडिया या 2 संघांविरुद्ध भिडणार, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर

BCCI Announced Team India Home Season Schedule 2025 : टीम इंडिया भारतात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 3 तर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 1 अशा एकूण 4 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या 4 मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Team India : 4 मालिका आणि 12 सामने, टीम इंडिया या 2 संघांविरुद्ध भिडणार, बीसीसीआयकडून  वेळापत्रक जाहीर
Indian Cricket TeamImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 02, 2025 | 8:05 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडिया ऑक्टोबर- डिसेंबर दरम्यान 2 संघांविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर महिन्याभरानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध एकूण 4 मालिकांमध्ये 12 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील या मालिकेचं आयोजन हे 6 ते 25 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेतील पहिला सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी,एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना हा 14 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. गुवाहाटीत कसोटी सामना खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

वनडे सीरिज केव्हा?

कसोटीनंतर दोन्ही संघात एकदिवसीय मालिका होईल. एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना 30 नोव्हेंबरला रांचीत होईल. दुसरा सामना 3 डिसेंबरला रायपूरमध्ये पार पडेल. तिसरा आणि अंतिम सामना 6

विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांचं वेळापत्रक

टी 20i मालिका

दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सांगता टी 20i मालिकेने होणार आहे. टी 20i मालिकेत 9 ते 19 डिसेंबरमध्ये एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. पहिला सामना 9 डिसेंबरला कटकमध्ये होईल. दुसरा सामना 11 डिसेंबर न्यू चडींगडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरला धर्मशाळा येथे खेळवण्यात येईल. चौथ्या सामन्याचा थरार 17 डिसेंबरला लखनौत रंगेल. तर पाचवा आणि अंतिम सामना अहमदाबादध्ये पार पडेल.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.