टीम इंडियाचा स्टार खेळाडू क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याच्या तयारीत?

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा हा क्रिकेटर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत प्लेअर ऑफ द सीरिज ठरला होता. मात्र आता या खेळाडूला सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याच्या तयारीत?
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 8:55 PM

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी 20 मालिकेसाठी शुक्रवारी रात्री भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकेसाठी 2 कर्णधारांची निवड केली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं एकदिवसीय मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्या टी 20 मालिकेत टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी पाहणार आहे. निवड समितीने अनेक वर्षांनी पृथ्वी शॉ याचा समावेश करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या खेळाडूला डच्चू देण्यात आला आहे.

टीम इंडियाचा स्टार ओपनर आणि कॅप्टन्सी सांभाळलेल्या ‘गब्बर’ शिखर धवनचा न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करणयात आली नाही. धवन सातत्याने धावांसाठी संघर्ष करतोय. शिखरला नुकतंच नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजसाठी कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून शिखर टीममधून बाहेर आहे.

शिखरचा श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजमध्येही समावेश करण्यात आला नव्हता. शिखर बांगलादेश दौऱ्यातही अपयशी ठरला होता. तेव्हा शिखरने 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये अनुक्रमे 3, 8 आणि 7 अशा एकूण 18 धावाच केल्या. शिखरला गेल्या 5 डावांमध्ये फक्त 49 धावाच करता आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. शिखर धवन या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत प्लेअर ऑफ द सीरिज ठरला होता. तेव्हा बर्मिंगघममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. धवनने तेव्हा रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना एकूण 24 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 धावांचं योगदान दिलं होतं. धवनने या संपूर्ण स्पर्धेत 363 धावा केल्या होत्या. त्यामुळे धवन ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरला होता.

शिखर धवनने टीम इंडियासाठी कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शिखरने 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 315 धावा, 167 वनडेत 6 हजार 793 रन्स आणि 68 टी 20 मध्ये एकूण 1 हजार 759 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त शिखरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 हजा 499 रन्स केल्या आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....