Asia Cup 2023 | आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?

Team India Squad For Asia Cup 2023 | बीसीसीआयने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Asia Cup 2023 | आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 1:56 PM

नवी दिल्ली | आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. आशिया कपसाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळने संघ जाहीर केली आहे. त्यानंतर आता अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज 21 ऑगस्ट रोजी बीसीसीआय निवड समितीने 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. नवी दिल्लीत निवड समिती आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचं कमबॅक

आशिया कपद्वारे विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांची दुखापतीनंतर टीममध्ये एन्ट्री झाली आहे. श्रेयसला गेल्या अनेक महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत होता. तर केएल राहुल याला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर दोघांनी एनसीएमध्ये कमबॅकसाठी कठोर परिश्रम घेतेले. या दोघांची आशिया कपसाठी निवड होणार की नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र अखेर हे दोघे परतले असल्याने टीम इंडियासाठी ही आनंदाची बाब आहे.

हे सुद्धा वाचा

आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.