AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयची IPL 2025 दरम्यान मोठी कारवाई, 5 जणांचा पत्ता कट

Bcci : बीसीसीआयने टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठा दणका दिला आहे. बीसीसीआयने या खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या.

बीसीसीआयची IPL 2025 दरम्यान मोठी कारवाई, 5 जणांचा पत्ता कट
Bcci And Ipl TrophyImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 21, 2025 | 4:53 PM
Share

भारतात सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. हा 18 वा मोसम रंगतदार स्थितीत पोहचला आहे. या 18 व्या मोसमाचा निम्मा टप्पा संपला असल्याने प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस वाढली आहे. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने या आयपीएल स्पर्धेदरम्यान घेतलेल्या एका निर्णयामुळे 5 खेळाडूंना मोठा झटका लागला आहे. बीसीसीआयने या 5 खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने या खेळाडूंचा वार्षिक करारातून पत्ता कट केला आहे. या खेळाडूंचा गेल्या करारात समावेश होता. मात्र यंदा ते खेळाडू स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत.

5 खेळाडूंचा पत्ता कट

आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा केला. अश्विन तेव्हापासून टीम इंडियासाठी खेळत नाही. त्यामुळे अश्विनला वार्षिक करारातून वगळण्यात येणार असल्याचं निश्चित होतं.

शार्दूल ठाकुर

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने टीम इंडियासाठी डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. शार्दूल तेव्हापासून टीम इंडियात नाही. तसेच शार्दूलला दुखापतीमुळेही काही काळ टीम इंडियापासून दूर रहावं लागलं. त्याच कारणाने शार्दूलचा वार्षिक करारात समावेश करण्यात आला नाही. शार्दूल आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचं प्रतिनिधित्व करत आहे.

आवेश खान

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खान याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नोव्हेंबर 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. आवेश सध्या आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळत आहे. आवेशने 2022 साली टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं. आवेशने टीम इंडियाचं 8 एकदिवसीय आणि 25 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आवेशही या वार्षिक करारात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

जितेश शर्मा

टीम इंडियासाठी 2024 मध्ये पदार्पण करणाऱ्या जितेश शर्मा याने 9 टी 20i सामने खेळले आहेत. मात्र जितेशला काही खास करता आलं नाही. जितेशला टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. बीसीसीआयने जितेशलाही डच्चू दिला आहे.

बीसीसीआयकडून चौघांना डच्चू

केएस भरत

टीम इंडियाचा विकेटकीपर केएस भरत यालाही वार्षिक करारातून वगळण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केएस गेली काही महिने टीम इंडियासोबत होता. मात्र त्याला काही खास करता आलं नाही. परिणामी केएसला डच्चू देण्यात आला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.