AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् बीसीसीआयच्या हृदयाला फुटला पाझर, अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी पुढे केला मदतीचा हात

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड गेल्या काही दिवसांपासून कँसर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार असून आर्थिक स्थिती मात्र ढासळली होती. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. आता बीसीसीआयने मदतीचा हात पुढे केला असून आर्थिक प्रश्न सुटणार आहे.

...अन् बीसीसीआयच्या हृदयाला फुटला पाझर, अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी पुढे केला मदतीचा हात
| Updated on: Jul 14, 2024 | 4:52 PM
Share

माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवड यांना ब्लड कँसर झाला असून त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने बरोड्यात परतले आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला होता. आता बीसीसीआयने एक पाऊल पुढे येत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने अंशुमन गायकवाड यांच्यासाठी एक कोटींचा फंड जारी केला आहे. न्यूज एजेंसी एएनआयच्या मते, बीसीसीआयच्या एपेक्स काउंसिल ने सांगितलं की, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांना 1 कोटी आर्थिक मदत करण्याचं जारी केलं आहे. इतकंच काय तर जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.

अंशुमन गायकवाड यांची आर्थिक स्थितीबाबत कळताच कपिल देव यांनी मदतीचा हात पुढे केला होता.आपल्या पेन्शनची रकम कुटुंबियांची सहमती असल्यास घ्यावी अशी विनंती केली होती. तसेच बीसीसीआयने अंशुमन गायकवाड यांना मदत करावी अशी विनंतीही केली होती. एका बातमीनुसार, सुनील गावस्कर, रवि शास्त्री, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदनलाल आणि किर्ती आझाद यासारख्या माजी क्रिकेटपटूंनी मदतीसाठी पुढे आले होते. त्यानंतर बीसीसीआयने तात्काळ पुढे येत मदतीचा निर्णय घेतला.

अंशुमन गायकवाड 1997 ते 2000 या कालावधीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी होते. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, अंशुमन गायकवाड 1975 ते 1987 या कालावधीत टीम इंडियासाठी खेळले. वेस्ट इंडिजविरुद्धच 1974 मध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या दरम्यान त्यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले. कसोटीत 1985 आणि 2 गडी बाद केले. तर वनडे त्यांनी 269 धावा केल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.