Team India | बीसीसीआयकडून बुमराह आणि अय्यर याच्याबाबत मोठी अपडेट, टीम इंडियासाठी गूडन्युज
आयपीएल दरम्यान टीम इंडियासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्य यांच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
मुंबई | आयपीएल 16 वा मोसम सुरु आहे. आतापर्यंत एकूण 19 सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलंय. या मोसमाच्या सुरुवातीपासून, त्याआधी आणि दरम्यान बऱ्याच खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या दोघांच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये दोन्ही संघांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दोन्ही संघांना आपल्या या खेळाडूची उणीव भासतेय. मात्र या दरम्यान टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
श्रेयस अय्यर याला बॅक इंज्युरीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं. तर बुमराह गेली कित्येक महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. बीसीसीआयने या दोघांच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. बीसीसीआयने बुमराह आणि अय्यर यांच्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
बुमराहवर न्यूझीलंडमध्ये पाठीच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया कोणत्याही वेदनेविना आणि यशस्वीरित्या पार पडली. बुमराह याला शस्त्रक्रियेच्या 6 आठवड्यांनंतर सराव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार बुमराहने शुक्रवारपासून बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली.
श्रेयस अय्यर याच्याबाबत काय?
श्रेयस याला बॅक इंज्युरीचा त्रास आहे. श्रेयसवर येत्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. श्रेयसवर शस्त्रक्रियेनंतर 2 आठवडे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असणार आहे. त्यानंतर अय्यर एनसीएत परतेल. दुखापत झालेला खेळाडू हा एनसीएत जाऊन त्यातून सावरण्यासाठी मेहनत करतो. त्यानंतर एनसीएने खेळाडू खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची एनओसी देते. त्यानंतरच खेळाडूचा टीममध्ये समावेश करण्यात येतो. मात्र टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी अशी की बुमराह एनसीएमध्ये गेला आहे.
बीसीसीआयची मेडिकल अपडेट
? NEWS ?
Medical Update: Jasprit Bumrah and Shreyas Iyer
Details ? #TeamIndiahttps://t.co/LKYAQi5SIn
— BCCI (@BCCI) April 15, 2023
दरम्यान शुक्रवारी पीटीआयने सूत्रांनुसार दिलेल्या वृत्तात, बुमराह आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपपर्यंत फिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुमराहमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्याने टीम इंडियाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे बुमराहच्या कमबॅकची क्रिकेट चाहते आवर्जुन वाट पाहत आहेत. मात्र बुमराह केव्हापर्यंत मैदानात परतेल,याबाबत अजूनही निश्चितता नाही.