Team India Test Captaincy : BCCI च ठरलय? ‘या’ टूर नंतर Rohit Sharma ला कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या हालचाली
Team India Test Captaincy : WTC 2023 मधील मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचे फॅन्स खवळले आहेत. भविष्याचा विचार करुन टीममध्ये बदल करण्याची मागणी सुरु आहे. BCCI सुद्धा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाला. तब्बल 209 धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला लढत देतेय, असं कुठे दिसलच नाही. कसोटी सामन्याच्या पाचही दिवसांवर एखाद-दुसर सेशन वगळता संपूर्णपणे ऑस्ट्रेलियन टीमने वर्चस्व गाजवलं. WTC 2023 मधील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या टेस्ट टीममध्ये बदलाची मागणी जोर धरु लागली आहे.
टीम इंडियाच्या आगामी टेस्ट सीरीजमध्ये अनेक सीनियर खेळाडूंना डच्चू मिळू शकतो. बीसीसीआयने त्या दृष्टीने तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत.
पहिला झटका कोणाला?
बदलाचा पहिला फटका कॅप्टन रोहित शर्माला बसू शकतो. टीम इंडिया WTC फायनलमध्ये हरली हे रोहितला कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा एक कारण आहेच. पण रोहितचा फिटनेस आणि वय लक्षात घेता, BCCI ला भविष्याचा विचार करावाच लागेल.
त्याच्यासाठी कॅप्टन म्हणून कुठली सीरीज शेवटची ठरणार?
टीम इंडिया पुढची सीरीज वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. टेस्ट कॅप्टन म्हणून रोहित शर्मासाठी विंडिज विरुद्ध सीरीज शेवटची मालिका असू शकते. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सिलेक्टर्स नव्या कॅप्टनच्या नावावर चर्चा करतील. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलय.
तेव्हा भवितव्याबाबत होणार निर्णय
वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितने धावांचा पाऊस पाडला, तर थोडीफार स्थिती बदलू शकते, अन्यथा गच्छंती अटळ आहे. रोहित शर्माला मागच्या अनेक महिन्यांपासून सूर सापडलेला नाहीय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्मा टीमच नेतृत्व करेल. त्यानंतर BCCI सोबत बैठक होईल. त्यात रोहितच्या टेस्ट फॉर्मेटमधील भवितव्याबाबत निर्णय होऊ शकतो.
बीासीसीआयमधील सीनियर सूत्राने काय सांगितलं?
“रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवणार यात अजिबात तथ्य नाहीय. रोहित शर्माने WTC च्या सायकलवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. पण तिसरी सायकल 2025 मध्ये संपेल, त्यावेळी रोहित शर्मा 38 वर्षांचा असेल” बीासीसीआयमधील सीनियर सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली. डिसेंबरपर्यंत कुठलीही टेस्ट सीरीज नाहीय
“दोन कसोटी सामन्यातील त्याचा बॅटिंग फॉर्म पाहून शिव सुंदर दास आणि त्यांचे सहकारी निर्णय घेतील. वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिका संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत कुठलीही टेस्ट सीरीज नाहीय. त्यामुळे सिलेक्टर्सकडे विचारमंथन करुन निर्णय घेण्यासाठी वेळ आहे. तो पर्यंत चेयरमन सुद्धा सिलेक्शन कमिटीवर येतील” अंस बीसीसीआयच्या सूत्राने सांगितलं.