U19 IND vs SA | बीडच्या सचिन धस याचं झुंजार अर्धशतक, टीम इंडियाचा डाव सावरला
Sachin Dhas Fifty | सचिन धस याने निर्णायक क्षणी मैदानात राहत टीम इंडियाचा डाव सावरला. इतकंच नाही, तर त्याने टीम इंडियासाठी अर्धशतकही झळकावलं आहे.
मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनल सामन्यामध्ये बीडचा मराठमोळा फलंदाज सचिन धस याने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. सचिन धस याने अर्धशतक ठोकत कॅप्टन उदय सहारन याच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला आहे. टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 245 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र सचिनने दबावात न येता अर्धशतक झळकावलं.
टीम इंडियाची वाईट सुरुवात
टीम इंडियाला 245 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर झटका लागला. आदर्श सिंह झिरोवर आऊट झाला. त्यानंतर मुशीर खान, अर्शीन कुलकर्णी आणि प्रियांशू मुलीया हे देखील झटपट आऊट होऊन मैदानाबाहेर गेले. मुशीरने 4, अर्शीनने 12 आणि प्रियांशू याने 5 धावा केल्या. टीम इंडियाची 11.2 ओव्हरमध्ये 4 बाद 32 अशी नाजूक स्थिती झाली. मात्र त्यानंतर उदय आणि सचिन या दोघांनी डाव सावरला.
तर दुसऱ्या बाजूला सचिन याने संधी मिळेल, तसं गिअर बदलत बॅटिंग केली. सचिनने 9 चौकारांच्या मदतीने 47 बॉलमध्ये चौकार ठोकत अर्धशतक झळकावलं. सचिनने 110. 64 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. उदय आणि सचिन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांकडून टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. त्यामुळे आता ही जोडी कुठपर्यंत मजल मारते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सचिन धसचं चिवट अर्धशतक
Sachin Dhas has brought life back into the India innings 🔥
A 47-ball fifty in the semi-final to follow his century against Nepal 👏 #INDvSA | #U19WorldCup
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 6, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.