Video : मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे, WTC च्या फायनलसाठी जाडेजाने कंबर कसली, खास व्हिडीओ पोस्ट

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठीची जाडेजाची तयारी सुरु झाली आहे. (Ravindra jadeja Preparation Workout)

Video : मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे, WTC च्या फायनलसाठी जाडेजाने कंबर कसली, खास व्हिडीओ पोस्ट
रवींद्र जाडेजा
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 9:49 AM

मुंबई : टीम इंडियाला (Team India) इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सहा सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने कंबर कसली आहे. दौऱ्याला जरी आणखी एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याच तयारीचा एक खास व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. (Before WTC Final And ind vs Eng Ravindra jadeja Preparation Workout)

रवींद्र जाडेजाचं पुनरागमन

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या अजिंक्यपदासाठी दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी कसून सराव करत आहेत. या महत्वाच्या सामन्यात आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी जाडेजा मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाडेजा दुखापतग्रस्त असल्याने तो खेळू शकला नव्हता. आता WTC फायलन आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.

जाडेजाकडून खास व्हिडीओ पोस्ट

मैदानात बहारदार परफॉर्मन्स द्यायचाय तर तयारीही तशीच असायला हवी, त्यासाठी जाडेजाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बुधवारी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो जीममध्ये असल्याचं दिसून येत आहे. इंग्लंड दौऱ्यासाठीची तयारी सुरु झाली आहे, वर्कआऊट, असं त्याने व्हिडीओसाठीच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड  18 ते 22 जून (साऊथहॅम्पटन)

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

(Before WTC Final And ind vs Eng Ravindra jadeja Preparation Workout)

हे ही वाचा :

भारताच्या दिग्गज फिरकीपटूची भविष्यवाणी, ‘हे 2 धुरंधर भारताला WTC फायनल जिंकवून देणार!’

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद, म्हणाला, ‘काम होऊन जाईल…!’

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.