इंग्लिश कॅप्टन म्हणतो, ब्रेंडन मॅक्कलममुळे आम्हाला 10 फूट उंच झाल्यासारखं वाटतंय
आजपासून क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉडर्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये (England vs Newzeland) कसोटी सामन्याला सुरुवात आहे. ब्रेंडन मॅक्कलम हे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आहेत.
मुंबई: ब्रेंडन मॅक्कलम (Brendon McCullum) यांनी कोच पदाची जबाबदारी संभाळल्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावल्याची भावना इंग्लिश कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) व्यक्त केली आहे. ब्रेंडन मॅक्कलम यांच्यामुळे संघातील खेळाडूंमध्ये ते 10 फूट उंच झाल्याची भावना निर्माण झालीय, असं स्टोक्स म्हणाले. मॅक्कलम यांच्या येण्याने संघाचा आत्मविश्वास उंचावला, असा या विधानामागे अर्थ आहे. आजपासून क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉडर्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये (England vs Newzeland) कसोटी सामन्याला सुरुवात आहे. ब्रेंडन मॅक्कलम हे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आहे. पण इंग्लंडच्या नॉर्थवेस्टमधील कमब्रियामध्ये तो लहानाचा मोठा झाला. ज्यो रुटच्या जागी बेन स्टोक्सची कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली आहे.
फक्त एक कसोटी सामना जिंकलाय
ब्रेंडन मॅक्कलम यांचा कोच म्हणून हा पहिलाच सामना आहे. स्टोकस आणि मॅक्कलम जोडीपुढे इंग्लंडला कसोटी क्रिकेटमधील वैभव प्राप्त करुन देण्याचं लक्ष्य आहे. इंग्लंडला मागच्या 17 पैकी फक्त एक कसोटी सामना जिंकता आला आहे. ब्रेंडन मॅक्कलम यांची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कोचपदी नियुक्त झाली आहे.
केन विलियमसनचं नेतृत्व
ब्रेंडन मॅक्कलम यांचा उत्तराधिकारी म्हणून केन विलियमसनची कॅप्टन पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता तोच न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. मागच्यावर्षी न्यूझीलंडने भारताला नमवून पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावलं होतं.
जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉडची जोडी दिसणार
मॅथ्यू पॉट्टस इंग्लंडकडून डेब्यू करणार आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही वेगवान गोलंदाजांची जोडीही खेळताना दिसणार आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत इंग्लंडसाठी 1,177 विकेट काढल्या आहेत.
ब्रेंडन मॅक्क्युलम KKR चे कोच
ब्रेंडन मॅक्क्युलम इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सचे कोच होते. यंदाचा सीजन संपल्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलम हे कोलकात नाइट रायडर्सच्या हेड कोच पदावरुन पायउतार झाले. KKR च्या टीम मिटिंगमध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी संघातील खेळाडूंना आपल्या निर्णयाची माहिती दिली.