AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS, 4Th Test | चौथी कसोटी ड्रॉ, टीम इंडियाने मालिका जिंकली

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. यासह टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे.

IND vs AUS, 4Th Test | चौथी कसोटी ड्रॉ, टीम इंडियाने मालिका जिंकली
| Updated on: Mar 13, 2023 | 3:54 PM
Share

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मैदानात टिकून चिवटपणे फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ कडे नेला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्या डावात 480 धावा केल्या. टीम इंडियाने या प्रत्युत्तरात 571 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 91 धावांची आघाडी मिळाली. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत बॅटिंग करत सामना ड्रा केला. यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा बॉर्जर गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा हा घरातला सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे.

टीम इंडियाचा पहिला डाव

टीम इंडियाने पहिल्या डावात कांगारुंनी डोंगराएवढ्या केलेल्या 480 धांवाचा टप्पा पूर्ण करुन 91 धावांची चांगली आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव 571 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून विराट कोहली याने 186 धावांची झुंजार खेळी केली. विराटने या खेळीत 364 बॉलमध्ये 15 चोकार ठोकले. विराटनंतर शुबमन गिल याने सर्वाधिक 128 रन्सची शतकी खेळी केली.

अक्षर पटेल याने 79 धावांची तुफानी खेळी साकारली. श्रीकर भरत याने विराट कोहली याला चांगली साथ देत 44 धावांचं योगदान दिलं. चेतेश्वर पुजारा 42 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन रोहित शर्मा याला 35 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजाला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. जडेजा 28 रन्सवर आऊट झाला. अश्विन मोठा फटका मारण्याच्या नादात 7 धावांवर खेळत असताना कॅचआऊट झाला.

मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर श्रेयस अय्यर याला दुखापतीमुळे खेळायला मैदानात येता आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी या जोडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुन्हेमन या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या.

कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.