Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0…भारताच्या एका बॉलरचा आजच्या मॅचमधला थक्क करुन सोडणारा स्पेल, बनवला नवीन रेकॉर्ड

कोण आहे हा टीम इंडियाचा गोलंदाज? ज्याने नेदरलँडच्या बॅट्समनसना बांधून टाकलं....

0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0…भारताच्या एका बॉलरचा आजच्या मॅचमधला थक्क करुन सोडणारा स्पेल, बनवला नवीन रेकॉर्ड
Team india
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 5:11 PM

सिडनी: भारतीय टीमचं आयसीसी वर्ल्ड कप 2022 मध्ये शानदार अभियान कायम आहे. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. टीम इंडियाने गुरुवारी दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवर विजय मिळवला. टीम इंडियाच्या अनुभवी गोलंदाजाने या मॅचमध्ये एक खास काम केलं. कोण आहे हा गोलंदाज? त्याने काय केलं? जाणून घ्या.

निवडक गोलंदाजांमध्ये समावेश

आम्ही बोलतोय भुवनेश्वर कुमारबद्दल. भुवनेश्वरने नेदरलँडसविरुद्ध डावातील पहिली आणि तिसरी ओव्हर टाकली. भुवनेश्वरने या दोन्ही मेडन ओव्हर टाकल्या. एकही धाव प्रतिस्पर्धी संघाला दिली नाही. आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वरला विकेटही मिळाला. दोन मेडन ओव्हर्समुळे भुवनेश्वरचा निवड गोलंदाजांच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. ज्यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या दोन्ही ओव्हर्स मेडन टाकल्या आहेत.

भुवनेश्वरच्या आधी कोणी अशी कामगिरी केली?

भुवनेश्वरच्या आधी अशीच कामगिरी इंग्लंडचा ऑफ स्पिनर ग्रॅम स्वानने 2012 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध केली होती. त्यानंतर 2014 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराने नेदरलँडस आणि रंगना हेराथने न्यूझीलंड विरुद्ध सुरुवातीच्या दोन्ही ओव्हर्स मेडन टाकल्या होत्या. या तिघांनंतर आता भुवनेश्वरने अशी कामगिरी केली आहे.

टीम इंडियासाठी दुसऱ्यांदा अशी कामगिरी

टी 20 इंटरनॅशनलमध्ये भुवनेश्वरने टीम इंडियासाठी ही कामगिरी दुसऱ्यांदा केलीय. याआधी मीरपूरमध्ये 2016 आशिया कप स्पर्धेत यूएई विरुद्ध त्याने अशीच कामगिरी केली होती.

अशी कामगिरी करणारे दोन गोलंदाज कोण?

भारतासाठी टी 20 इंटरनॅशनलमध्ये भुवनेश्वरच्या आधी हरभजन सिंहने 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलंबोमध्ये दोन ओव्हर मेडन टाकल्या होत्या. हरभजन नंतर जसप्रीत बुमराहने पाकिस्तान विरुद्ध मीरपूरमध्ये दोन ओव्हर मेडन टाकल्या होत्या.

टीम इंडियाने आजच्या सामन्यात नेदरलँडसवर 56 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियीने 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँडच्या टीमने 9 बाद 123 धावांपर्यंत मजल मारली.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.