Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

पृथ्वीने आयपीएलच्या चालू मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले असून 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण 259 धावा केल्या आहेत.

Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल
सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:34 PM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध आयपीएल-2022 (IPL 2022) सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ (prithvi shaw) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पृथ्वीने स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. पृथ्वी शॉला खूप ताप होता, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. पृथ्वीनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला आहे. त्याच्या समोरच्या टेबलावर लॅपटॉपही ठेवला आहे. पृथ्वीने लिहिले की, ‘मी रुग्णालयात दाखल आहे आणि सध्या तापातून बरा आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी लवकरच मैदानात परतेन. पृथ्वीने आयपीएलच्या चालू मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले असून 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण 259 धावा केल्या आहेत.

दिल्ली संघ कोरोनाच्या सावटाखाली

आयपीएलच्या 15 व्या हंगामादरम्यान कोरोनाच्या सावटाखाली दिल्ली कॅपिटल्सचे काही सपोर्ट स्टाफ आले आहेत. एवढेच नाही तर संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या पत्नीलाही कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे पाँटिंगलाही आयसोलेशनमध्ये जावे लागले. बीसीसीआयने आयपीएलसाठी बनवलेल्या कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्‍या फेरीतून जावे लागेल आणि तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये एकटे राहतील. पृथ्वी शॉची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली आहे. पृथ्वी संघाच्या शेवटच्या सामन्यातही खेळला नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “पृथ्वी सध्या मुंबईतील रुग्णालयात बरा आहे. खूप ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले पण त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते कोविड रुग्णांसाठी नियुक्त केलेले रुग्णालय नाही.

सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण

डीसीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं काही खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली. या वातावरणाचा कुठेतरी दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्यापासून एक पाऊल दूर आहे. CSK आज पराभूत झाल्यास तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला दुसरा संघ होईल. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.