IPL 2022: Hardik Pandya चं मोठं प्रमोशन होणार, लवकरच कॅप्टन म्हणून होणार नियुक्ती
IPL 2022: इंडियन प्रिमीयर लीगचा सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पंड्या पुन्हा भारतासाठी खेळू शकेल की, नाही, अशी चर्चा होती. कारण त्याच्या फिटनेसबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पंड्या पुन्हा भारतासाठी खेळू शकेल की, नाही, अशी चर्चा होती. कारण त्याच्या फिटनेसबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आयपीएल सुरु होण्याआधी मागच्यावर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो शेवटचा खेळला होता. पण आयपीएल 2022 (IPL 2022) च्या सीजनने सर्व चित्रच बदलून टाकलय. हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या खेळाने फक्त टीकाकारांची तोंडच बंद केली नाहीत, तर त्याने त्याची क्षमता दाखवून दिली आहे. हार्दिक पंड्याने आपल्या खेळाने फक्त क्रिकेट रसिकांनाच नव्हे, तर BCCI निवड समिती सदस्यांनाही प्रभावित केलं आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याची कामगिरी दमदार आहेच. पण त्याचवेळी त्याने आपल्या कॅप्टनशिप कौशल्याने सर्वांना प्रभावित केलं आहे. हार्दिकने आयपीएलच्या 14 इनिंगमध्ये 453 धावा केल्या आहेत. यात चार हाफ सेंच्युरी आहेत.
निवड समिती सदस्याने दिले संकेत
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा दौरा आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुलला कॅप्टन बनवण्यात आलय, तर इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी रोहित शर्मा कॅप्टन असेल. या दरम्यान भारतीय संघ आयर्लंड विरुद्धही मालिका खेळणार आहे. या आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीचे सदस्य कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाचा विचार करत आहेत.
सर्वात जास्त समाधान देणारी बाब म्हणजे…
“हार्दिकने त्याच्या खेळाने प्रभावित केलय. सर्वात जास्त समाधान देणारी बाब म्हणजे कॅप्टन म्हणून तो जास्त जबाबदार वाटलाय. आयर्लंड दौऱ्यासाठी कॅप्टन म्हणून त्याच्या नावाचा विचार सुरु आहे” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. धावांबरोबरच तो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतोय. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी केएल राहुल आणि ऋषभ पंतची सुद्धा निवड झाली आहे. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारताला कर्णधाराची गरज आहे.