Madhuri Dixit | या क्रिकेटरच्या प्रेमात होती माधुरी दीक्षित, पाकिस्तानला धूधू धुतलं होतं या क्रिकेटरने
Madhuri Dixit Love Story | बॉलीवूड आणि क्रिकेटचा फार जवळचा संबंध राहिला आहे. अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींनी एकमेकांचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केलाय. तर काहींची पार्टनरशीप दुर्देवाने होऊ शकली नाही.
मुंबई | बॉलीवूड आणि क्रिकेटचं नातं हे गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे. काही क्रिकेटपटू-अभिनेत्रींमधील नातं हे थेट लग्नापर्यंत पोहचलं. विराट कोहली-अनुष्का शर्मा, हरभजन सिंह-गीता बसरा हे त्याची उत्तम उदाहरणं आहेत. तर काही क्रिकेटर आणि अभिनेत्रीमध्ये असलेल्या रिलेशनची चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यांचं रिलेशन फार वेळ टिकू शकलं नाही. अशीच काहीशी लव्हस्टोरी ही टीम इंडियाच्या माजी कर्णधाराची आहे. हा माजी कर्णधार आणि बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री या दोघांबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र काही कारणाने या दोघांची ‘पार्टनरशीप’ होऊ शकली नाही
ही गोष्ट आहे आजपासून अनेक वर्षांपूर्वींची. टीम इंडियाचा माजी कर्णधार अजय जडेजा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित दोघांची जोडी जमू शकली नाही. दोघांनी एकत्र येणं हे नियतीला मान्य नव्हतं. तेव्हा माधुरी आघाडीची अभिनेत्री होती. माधुरीने आपल्या अभिनयाने आणि डान्सने तिच्या चाहत्यांना वेड लावलं होतं. मात्र हीच माधुरी टीम इंडियाचा कॅप्टन अजय जडेजाच्या प्रेमात ठार वेडी झाली होती. माधुरी अजयच्या प्रेमात वाटेल ते करायला तयार होती. मात्र कधी परिस्थीमुळे तर कधी कुटुंबाच्या विरोधामुळे अजय आणि माधुरी एक होऊ शकले नाहीत.
अजय जडेजा आणि माधुरी दीक्षीत या दोघांची पहिली भेट ही एका जाहीरातीच्या शूटिंगदरम्यान झाली. इथून दोघांमध्ये जवळीक वाढली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळलं नाही.
अजय जडेजा हा राजघराण्याील. राजा रणजितसिंह हे अजय जडेजा याच्यां वडिलांचे आजोबा होते. राजा रणजितसिंह यांच्या नावाने रणजी ट्रॉफी खेळवण्यात येते. तर माधुरी दीक्षीत हीची स्थिती जडेजा कुटुंबियांच्या तुलनेत चांगली नव्हती. त्यामुळे माधुरीची वाढती जवळीक अजय जडेजाच्या कुंटुंबियांना खटकत होती. या रिलेशनचा परिणाम हा अजय जडेजाच्या कामगिरीवरही झाला.
आधी कुटुंबियांचा विरोध असतानाच अजय जडेजाच्या अडचणीत वाढ झाली. अजय जडेचा याचं नाव हे 1999 साली मॅच फिक्सिंगमध्ये आलं. त्यामुळे जडेजावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे अजय जडेजाच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. दिल्ली उच्च न्यायालयाने 2003 मध्ये बंदी उठवली. मात्र तोवर उशीर झाला होता.
अजय जडेजावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. अजय जडेजा याच्या विरोधात देशभर वातावरण तापलं होतं. क्रिकेट चाहत्यांनी अजय जडेजावरील आरोपांवरुन प्रतिकात्मक पुतळे जाळले. परिस्थिती अजय जडेजा याच्याविरोधात गेली होती. त्यामुळे माधुरीच्या कुटुंबियानी या दोघांच्या नात्याला विरोध दर्शवला. या दरम्यान माधुरीची भेट अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी झाली.
काही काळानंतर 1999 साली माधुरी नेनेंची सून झाली. त्यानंतर माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली. माधुरी आणि डॉ नेने या दोघांना 2 मुलं आहेत. तर अजय जडेजा आणि जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली यांचा विवाह पार पडला. अशाप्रकारे या लव्हस्टोरीचा द एन्ड झाला.