Shraddha Kapoor Reaction : Shubman gill च्या वादग्रस्त विकेटवर श्रद्धा कपूरची Reaction, म्हणाली…
Shraddha Kapoor Reaction On Shubman Gill Wicket : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या WTC फायनल दरम्यान शुबमन गिलच्या विकेटवरुन बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आता श्रद्धा कपूरची Reaction सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
मुंबई : बॉलिवूडच क्रिकेटसोबत एक वेगळं नातं आहे. बॉलिवूड स्टार्सना क्रिकेट पहायला आणि खेळायला भरपूर आवडतं. नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना झाला. या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने आरामात विजय मिळवला. ते टेस्ट चॅम्पियन बनले. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मैदानात उपस्थित राहून ही मॅच पाहू शकली नाही. तिने घरी या मॅचचा आनंद घेतला.
या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शुबमन गिलच्या विकेटवरुन मोठा वाद झाला. शुबमन नॉट आऊट होता, असं अनेकांच म्हणणं आहे. शुबमनला बाद देण्याचा निर्णय श्रद्धाला पटला नाही.
श्रद्धा कपूरला निर्णय पटला नाही
या मॅचमध्ये कॅमरुन ग्रीनने शुबमन गिलची कॅच पकडली. रिप्लेमध्ये ग्रीन कॅच पकडत असताना, चेंडूचा ग्राऊंडला स्पर्श झाल्याच दिसत होतं. यावरुन बराच वाद झाला. अंपायरच्या निर्णयावर बरीच टीका झाली. स्वत: शुबमन गिलही अंपायरच्या निर्णयाने नाराज झाला. मॅच पाहणाऱ्या श्रद्धा कपूरला सुद्धा अंपायरचा निर्णय पटला नाही. तिने खूप गमतीशीर अंदाजात अंपायरच्या निर्णयावर टोमणा मारला.
या विकेटमुळे टीम इंडिया बॅकफूटवर
अभिनेत्री श्रद्धा कूपरने इन्स्टाग्राम स्टोरीवर सोललेल्या बदामाचा फोटो शेयर केला. यात ती हसताना दिसतेय. तिच्या हातामध्ये बदाम आहेत. ‘तिसऱ्या अंपायरला मी बदाम ऑफर करते’, असं तिने कॅप्शन स्टोरीला दिलय. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात शुबमन गिलचा विकेट खूप महत्वाचा होता. या विकेटमुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. रणबीरसोबत जमली जोडी
वर्क फ्रंट बद्दल बोलायच झाल्यास श्रद्धा कपूर सध्या आपली लेटेस्ट रिलीज फिल्म ‘तू झूठी मैं मक्कार’चं यश सेलिब्रेट करतेय. या फिल्ममध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. दोघांच्या जोडीला फॅन्सचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने सुद्धा चांगली कमाई केली.