ODI World Cup 2023 | वर्ल्ड कपमुळे ‘या’ बॉलिवूड स्टार्सचे बॉक्स ऑफिसवर आपटू शकतात चित्रपट

ODI World Cup 2023 | शेड्युल जाहीर झालय. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांसाठी अडचणी वाढणार आहेत. कारण ज्यावेळी वर्ल्ड कपचे सामने आहेत, त्याचवेळी मोठ्या स्टार्सचे चित्रपट रिलीज होणार आहेत.

ODI World Cup 2023 | वर्ल्ड कपमुळे 'या' बॉलिवूड स्टार्सचे बॉक्स ऑफिसवर आपटू शकतात चित्रपट
भारतात यंदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, या स्पर्धेचं आयोजन 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलंय. आता सामन्यांच्या वेन्यूबाबत अर्थात ठिकाणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 11:21 AM

मुंबई : भारतात यावर्षी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपच शेड्युल मंगळवारी जाहीर झालं. क्रिकेट चाहते बऱ्याच महिन्यापासून वनडे वर्ल्ड कपच्या शेड्युलची वाट पाहत होते. शेड्युल जाहीर झालय. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांसाठी अडचणी वाढणार आहेत. कारण ज्यावेळी वर्ल्ड कपचे सामने आहेत, त्याचवेळी मोठ्या स्टार्सचे चित्रपट रिलीज होणार आहेत. वर्ल्ड कपमुळे या चित्रपटांच्या बिझनेसला फटका बसू शकतो. वर्ल्ड कप यावर्षी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप 12 वर्षानंतर भारतात होत आहे.

वर्ल्ड कपच्या दरम्यान रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या बिझनेसवर वर्ल्ड कप मॅचचा प्रभाव पडू शकतो. कारण प्रेक्षक त्यावेळी क्रिकेट सामने पाहतील.

वर्ल्ड कपमध्ये कुठले चित्रपट प्रदर्शित होणार?

इंग्लंड-न्यूझीलंड वर्ल्ड कपची पहिली मॅच 5 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. यादिवशी अक्षय कुमारचा द ग्रेट इंडियन रेस्क्यू चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 20 ऑक्टोबरला टायगर श्रॉफचा गणपत आणि यारिया 2 चित्रपट रिलीज होईल. त्यावेळी बंगळुरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना आहे.

शनिवार-रविवार जास्त फटका बसणार

वीकेंडला भारताचा सामना आहे. त्यानंतर प्रत्येक वीकेंडला भारताचा सामना आहे. रविवारी 8 ऑक्टोबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि रविवारी 15 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होईल. रात्री 10-11 पर्यंत मॅच संपेल. अशावेळी चित्रपटांवर परिणाम होऊ शकतो.

सलमानचा चित्रपट कधी रिलीज होणार?

द ग्रेट इंडियन रेस्क्यू, गणपत आणि यारियां 2 नंतर 24 ऑक्टोबरला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा वॅक्सीन वॉर, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा योद्धा आणि 10 नोव्हेंबरला सलमान खानचा टायगर 3 चित्रपट रिलीज होईल. वर्ल्ड कप 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. बॉक्स ऑफिसला धोका

टायगर श्रॉफ असो, किंवा सलमान खान वर्ल्ड कपची क्रेज सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणणं सोपं नसेल. बॉलिवूड आधीपासूनच कंटेटच्या समस्येचा सामना करत आहे. प्रेक्षक थेट चित्रपटांकडे पाठ फिरवतायत. त्यात आता बॉक्स ऑफिसला क्रिकेट वर्ल्ड कपपासून धोका आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.