MS Dhoni | घटस्फोटाची चर्चा असलेली अभिनेत्री ‘या’ देशातील हॉटेलमध्ये दिसली होती धोनीसोबत

MS Dhoni | ती म्हणजे सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाप. सोज्वळ चेहरा आणि त्यावरील हास्य यामुळे तिचे लाखो चाहते निर्माण झाले होते. त्यावेळी ती धोनीला श्रीलंकेत भेटून खूप खूश होती.

MS Dhoni |  घटस्फोटाची चर्चा असलेली अभिनेत्री 'या' देशातील हॉटेलमध्ये दिसली होती धोनीसोबत
MS dhoni
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 11:23 AM

मुंबई : सध्या एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कथित घटस्फोटाची चर्चा आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीत स्वत:ची ओळख बनवली होती. मागची काही वर्ष ती चित्रपट सृष्टीपासून दूरच आहे. आती ती तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. एवढेच नव्हे तर तिने लग्नाचे फोटोही डिलीट केल्याने फॅन्स हैराण झाले आहेत.

पतीपासून ती वेगळी होणार असल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आलं आहे. या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘गजनी’. आमिर खानसोबत तिने या चित्रपटात मुख्य नायिका रंगवली होती.

सोज्वळ चेहरा आणि हास्य यामुळे लाखो चाहते

‘गजनी’ चित्रपटाने या अभिनेत्रीला ओळख मिळवून दिली. पुढे तिने अक्षय कुमारसोबत काही चित्रपटात काम केलं. नंतर तिने मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांच्यासोबत 2016 मध्ये लग्न केलं. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच नाव आहे असिन. सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाप म्हणजे असिन. सोज्वळ चेहरा आणि त्यावरील हास्य यामुळे असिनचे लाखो चाहते निर्माण झाले होते.

एमएस धोनी बरोबर नाव जोडलं

आता याच असिनच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं म्हटल जातय. ती पतीपासून विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. याच असिनच टीम इंडियााच माजी कॅप्टन एमएस धोनी बरोबर नाव जोडलं गेलं होतं.

धोनीशी कधी झाली ओळख?

असिन आणि एमएस धोनीने एका व्यावसायिक जाहीरातीत एकत्र काम केलं होतं. तिथे त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. ओळख पुढे मैत्रीत बदलली. दोघे परस्परांना डेट करत असल्याच्या चर्चा त्यावेळी सुरु होत्या. अखेर धोनीने साक्षी रावतशी लग्न केल्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दोघे एकाच हॉटेलमध्ये

धोनीच लक्ष्मी राय आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींसोबत सुद्धा नाव जोडलं गेलं होतं. असिन सलमान खान सोबतच्या ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी श्रीलंकेमध्ये होती. त्यावेळी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा सुद्धा होता. धोनी आणि असिन त्यावेळी एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. त्यावेळी दोघांची भेट झाली होती. असिन त्यावेळी धोनीला भेटून खूप खूश होती. या निमित्ताने मला त्याला भेटून व्यक्तीगत शुभेच्छा देता आल्या, असं असिनने त्यावेळी म्हटलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.