IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने भारतात पाऊल ठेवताच BCCI ने दिला पहिला धक्का, आता कांगारु काय करणार?

IND vs AUS Test : सीरीजच्या तयारीसाठी त्यांनी बंगळुरुमध्ये सराव सुरु केलाय. नागपूरमध्ये टेस्ट सीरीजचा पहिला सामना खेळला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन टीम बंगळुरुमध्ये कसून सराव करणार आहे.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने भारतात पाऊल ठेवताच BCCI ने दिला पहिला धक्का, आता कांगारु काय करणार?
ind vs aus test series
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 10:15 AM

IND vs AUS Test : न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीज संपली. टीम इंडियाने आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केलय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार टेस्ट मॅचची सीरीज नऊ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन टीम भारतात दाखल झाली. सीरीजच्या तयारीसाठी त्यांनी बंगळुरुमध्ये सराव सुरु केलाय. नागपूरमध्ये टेस्ट सीरीजचा पहिला सामना खेळला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन टीम बंगळुरुमध्ये कसून सराव करणार आहे.

पराभवाचा बदला घेण्यासाठी आतुर

भारतीय टीम ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर सीरीज खेळली होती. त्यावेळी टीम इंडियाने 2-1 अशा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. या सीरीजमध्ये भारताच्या काही स्टार खेळाडूंना दुखापत झाली होती. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी मिळालेली. ऑस्ट्रेलियन टीम आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आतुर आहे. बीसीसीआयने त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. ऑस्ट्रेलियन टीमने एका कारणामुळे भारतात सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांच्यासोबत तसच झालय.

ऑस्ट्रेलियाचा आक्षेप काय?

ऑस्ट्रेलियन टीमने टेस्ट सीरीजआधी कुठलाही सराव सामना खेळायला नकार दिला. भारतात सराव सामना खेळण्याचा काही फायदा होत नाही, असं टीमचा स्टार बॅट्समन स्टीव स्मिथ आणि एंड्रयू मॅकडोनाल्ड यांचं मत होतं. प्रत्यक्ष मॅचच्यावेळी जी खेळपट्टी असते, तसा पीच बीसीसीआय सराव सामन्याच्यावेळी देत नाही, असा त्यांचा आक्षेप होता. त्यांना बीसीसीआयवर विश्वास नाहीय.

बीसीसीआयने काय केलं?

ऑस्ट्रेलियन टीमला ज्या गोष्टीची भिती होती, तेच पुन्हा त्यांच्यासोबत झालय. ऑस्ट्रेलियन टीमचा जिथे कॅम्प लागलाय, ती पूर्णपणे हिरवीगार विकेट आहे. म्हणजे बीसीसीआयने पुन्हा तीच विकेट दिलीय, जिथे स्पिन बॉलर्सना कुठलीही मदत मिळत नाही. बीसीसीआयच मोठं पाऊल

भारतातील बहुतांश विकेट स्पिन फ्रेंडली आहेत. ऑस्ट्रेलियन विकेट्सवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ऑस्ट्रेलियात जशा विकेट्स असतात, तशीच विकेट बीसीसीआयने भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला दिली आहे. ऑस्ट्रेलियाला जास्त फायदा मिळू नये, हा त्यामागे उद्देश आहे. ऑस्ट्रेलियन टीम इथे 6 फेब्रुवारीपर्यंत सराव करेल. त्यानंतर ते नागपूरला रवाना होतील.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.