AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहला व्हाइस कॅप्टन बनवण्याच्या खेळीमागे ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंसाठी मोठा इशारा

निवड समितीने आतापर्यंत कर्णधार, उपकर्णधारपदासाठी नेहमीच फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जसप्रीत बुमराहला व्हाइस कॅप्टन बनवण्याच्या खेळीमागे 'या' दोन प्रमुख खेळाडूंसाठी मोठा इशारा
टॉप 10 मध्ये एकही भारतीय नसून भारताचा नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 व्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 586 गुण आहेत.
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 4:14 PM

मुंबई: निवड समितीने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघनिवड जाहीर केली. रोहित शर्मा (Rohit sharma) दुखापतीतून सावरलेला नसल्यामुळे त्यांनी कसोटी टीमचा उपकर्णधार केएल राहुलकडे (KL Rahul) वनडेचे नेतृत्व सोपवले. वनडे टीमच्या कर्णधारपदी राहुलची निवड करण्याचा निर्णय योग्यच आहे. पण उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराहची (Jasprit bumrah) निवड करुन निवड समितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण बुमराह गोलंदाज आहे. (Bumrahs elevation as ODI deputy vice captain is clear message to Pant and iyer)

फलंदाजाऐवजी गोलंदाजाला प्राधान्य कसं?

निवड समितीने आतापर्यंत कर्णधार, उपकर्णधारपदासाठी नेहमीच फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जसप्रीत बुमराह या पदासाठी पात्र नाही, असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण बुमराहने वनडे, टेस्ट आणि टी-20 क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्सची कर्णधारपदी निवड केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध Ashes मालिकेत विजयी आघाडी सुद्धा घेतली आहे.

जसप्रीत बुमराह व्हाइस कॅप्टन होणं, या दोन खेळाडूंसाठी इशारा 

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कदाचित ऑस्ट्रेलियन निवड समितीकडून प्रेरणा घेऊन बुमराहची उपकर्णधारपदी निवड केली असावी. खरंतर सध्याच्या भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्याकडे कॅप्टनशीपचा अनुभव आहे. अय्यर आणि पंतने आयपीएलमधल्या संघाचे नेतृत्व केले आहे. जसप्रीत बुमराहला व्हाइट कॅप्टन बनवणं, हा ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी एक संदेश आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्यांना सातत्य त्यांना दाखवाव लागेल. निवड समिती जवळच्या सूत्रांनी हे सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं.

बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार कामगिरी केली आहे. “तुम्ही याकडे फक्त एक मालिका म्हणून बघा. रोहित दुखापतीमधून सावरल्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व त्याच्याकडेच असेल. त्यावेळी केएल राहुल उपकर्णधार असेल” असे बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला सांगितले. “जसप्रीत बुमराहची कामगिरी लक्षात घेऊन निवड समितीला त्याला सन्मानित करायचं होतं. क्रिकेट समजण्याची त्याची हुशारी आणि कामगिरीत सातत्य आहे, त्यामुळेच पंत आणि अय्यरऐवजी त्याला उपकर्णधार बनवलं” असं या सूत्राने सांगितलं.

संबंधित बातम्या: 

South Africa vs India 2nd Test: उद्या पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे जोहान्सबर्गचा वेदर रिपोर्ट Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा, सरकारच्या ताफ्यातील वाहनं इलेक्ट्रीक असणार

(Bumrahs elevation as ODI deputy vice captain is clear message to Pant and iyer)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.