IPL 2022, PBKS vs CSK, Orange Cap : ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर पंजाबने विजय मिळवलाय. यानंतर ऑरेंज कॅपमध्ये काय बदल झाले आहेत. पाहुया
मुंबई: आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील काल म्हणजेच सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. दरम्यान, कालच्या सामन्यातील पंजाबच्या विजयाने चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झाले आहेत का?, पाहुया
ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?
ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्य्ये पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 491 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 368 धावा या सीजनमध्ये केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने आतापर्यंत 302 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या हा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 295 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे. त्याने 272 धावा केल्या आहेत.
ऑरेंज कॅपचा टेबल
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
इतर बातम्या