IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO
IND vs SL: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपले केस रंगवले आहेत. त्याने आपल्या केसांना फिकट तपकिरी रंग दिला आहे.
धर्मशाळा: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपले केस रंगवले आहेत. त्याने आपल्या केसांना फिकट तपकिरी रंग दिला आहे. सिराजच्या या नव्या हेअर स्टाइलवरुन सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झालेत. रविवारी भारतीय संघातील लेगस्पिनर युजवेंद्र चहलनेही (Yuzvendra chahal) केसांच्या या नव्या स्टाइलवरुन मोहम्मद सिराजची फिरकी घेतली. भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर कॅमेऱ्यासमोर ही धमाल रंगली होती. भारताने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा टी 20 सामना सहा विकेटने जिंकला व मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप विजय मिळवला. सामना संपल्यानंतर युजवेंद्र चहल या मालिकेचा हिरो श्रेयस अय्यरची (Shreyas iyer) मुलाखत घेत होता. त्यावेळी मुलाखत संपवताना शेवटी चहल आणि अय्यर मिळून मोहम्मद सिराजची फिरकी घेतली. हा व्हिडिओ पाहतानाही तुम्हाला नक्कीच हसू येईल.
पहिल्याच चेंडूवर केलं क्लीनबोल्ड
“आता सिराज आपल्यासोबत आलाय. तुम्ही त्याचे केस बघू शकता. गवताला पाणी मिळालं नाही, की, गवत कसं सुकतं, तसे आता सिराजचे केस वाटत आहेत” या चहलच्या वाक्यानंतर तिघेही हसत सुटले. मोहम्मद सिराज काल शेवटच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळला. सिराजने त्याच्या चार षटकात 22 धावा देत एक विकेट घेतला. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने दानुष्का गुणथिलकाला क्लीन बोल्ड केलं. या महिन्याच्या सुरुवातीला सिराज वेस्ट इंडिज विरुद्ध तीन वनडे सामने खेळला. त्यात त्याने पाच विकेट काढल्या. शेवटच्या वनडेमधील 29 धावात तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
From mantra of success to a guest apperance! ??
Chahal TV Special: @ShreyasIyer15, with @mdsirajofficial for company, chats with @yuzi_chahal after #TeamIndia‘s T20I series sweep. ? ? – By @Moulinparikh
Full interview ? ? #INDvSL @Paytm https://t.co/FOL75d7bIs pic.twitter.com/4Awzp9BvIK
— BCCI (@BCCI) February 28, 2022
श्रेयसला रोखण श्रीलंकेच्या गोलंदाजांना जमलं नाही
तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यासाठी युजवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली होती. त्याने पहिल्या दोन सामन्यात फक्तच दोन विकेट घेतल्या. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मॅचमध्ये त्याने 49 धावात चार विकेट घेतल्या होत्या. श्रेयसने या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. त्याने तीन सामन्यात 204 धावा केल्या. यात तीन नाबाद अर्धशतक आहेत. श्रेयसला रोखण श्रीलंकेच्या गोलंदाजांना जमलच नाही. श्रेयसने चौकार-षटकारांबरोबर एकेरी-दुहेरी धावाही पळून काढल्या.