CSK vs MI IPL 2023 Result : अरेरे, मुंबई हरली, एमएस धोनीच्या चेन्नईकडून MI चा दारुण पराभव

CSK vs MI IPL 2023 : विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स हरली. पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईच्या टीमला विजयाचा फायदा झाला आहे. तेच मुंबई इंडियन्सला आता यापुढचे सामने जिंकावेच लागतील.

CSK vs MI IPL 2023 Result : अरेरे, मुंबई हरली, एमएस धोनीच्या चेन्नईकडून MI चा दारुण पराभव
CSK vs MI IPL 2023Image Credit source: BCCI IPL
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 7:12 PM

चेन्नई : सलग दोन मॅच जिंकून कमबॅक करणाऱ्या मुंबई इंडियन्सला आज चेन्नई सुपर किंग्सने झटका दिला. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर आरामात विजय मिळवला. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक आहे. पण चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

मुंबई इंडियन्सची टीम 6 व्या स्थानावर आहे. मुंबईचे पाच सामने बाकी आहेत. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक (44) धावा केल्या. ओपनर ऋतुराज गायकवाड (30) आणि डेवॉन कॉनवेने दमदार सलामी दिली.

धोनीकडून विजयावर शिक्कामोर्तब

ओपनर ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईची पहिली विकेट गेली. त्याने 16 बॉलमध्ये 30 धावा करताना 4 फोर, 2 सिक्स मारले. पियुष चावलाने इशान किशनकरवी झेलबाद केलं. अजिंक्यला पियुष चावलाने LBW आऊट केलं. त्याने 21 धावा केल्या. कॅप्टन धोनीने नाबाद (2) चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिवम दुबेने 18 चेंडूत नाबाद 26 धावा फटकावताना 3 सिक्स मारले.

एकटा नेहल लढला

आजच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. अपवाद फक्त नेहल वढेराचा. सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी मुंबईला बॅकफूटवर ढकललं. पहिल्या तीन ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने कॅमरुन ग्रीन (6), इशान किशन (7) आणि कॅप्टन रोहित शर्माच्या (0) रुपाने तीन महत्वाचे विकेट गमावले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (26) आणि नेहल वढेराने (64) डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. टिम डेविडला आज जमलं नाही

सूर्या आऊट झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स बॅटिंगला आला. त्याची नेहलसोबत जोडी जमली. पण दोघांना धावगती वाढवता आली नाही. स्टब्सने 20 रन्स केल्या. मुंबईकडून एकटा नेहल वढेरा लढला. त्याने 51 चेंडूत 64 धावा केल्या. यात 8 फोर आणि 1 सिक्स होता. मुंबई इंडियनस्चा स्फोटक फलंदाज टीम डेविड स्वस्तात बाद झाला. 19 व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने त्याला गायकवाडकरवी झेलबाद केलं. टिम डेविडने 4 चेंडूत 2 रन्स केल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.