IPL 2022, DC vs CSK : चेन्नईचा मोठ्या फरकानं ‘सुपर’ विजय, मोईननं एका षटकात घेतले दोन बळी, पाहा Highlights Video

चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या असून दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, या लक्ष्याला पार करताना दिल्लीला मोठं कठीण गेलं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.4 षटकांत 117 धावांवर गारद झाला.

IPL 2022, DC vs CSK : चेन्नईचा मोठ्या फरकानं 'सुपर' विजय, मोईननं एका षटकात घेतले दोन बळी, पाहा Highlights Video
चेन्नईचा 91 मोठ्या फरकानं 'सुपर' विजयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 12:14 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पहिले फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या असून दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, या लक्ष्याला पार करताना दिल्लीला मोठं कठीण गेलं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.4 षटकांत 117 धावांवर गारद झाला. डेव्हॉन कॉनवेच्या  87 धावानंतरही नंतर मोईन अलीच्या घातक गोलंदाजीमुळे चेन्नईने दिल्लीला हरवले. या सामन्यात मोईनने मिचेल मार्श, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि रिपल पटेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. अशा प्रकारे चेन्नईचा 91 मोठ्या फरकानं ‘सुपर’ विजय झालाय.

मोईनने घेतलेल्या विकेट्स, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

प्लेऑफची आशा कायम

चेन्नईच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. त्यांचे 11 सामन्यांतून चार विजय आणि सात पराभवांसह आठ गुण आहेत. चेन्नईचे सध्या 10 गुण असून येथून संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत. यानंतर उर्वरित संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल. या पराभवाने दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांच्याकडे 11 सामन्यांतून पाच विजय आणि सहा पराभवांसह 10 गुण आहेत. हा संघ सध्या पाचव्या स्थानावर असून त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत.

दिल्लीला पहिला धक्का

सिमरजित सिंगने दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर केएस भरतला स्लिपमध्ये मोईन अलीकडून झेलबाद केले. भरतला पाच चेंडूत केवळ आठ धावा करता आल्या.

डेव्हिड वॉर्नरला एलबीडब्ल्यू

पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर महेश टेकशनाने चेन्नई सुपर किंग्जला मोठा विजय मिळवून दिला. त्याने स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला एलबीडब्ल्यू केले.

मार्शला ऋतुराजकडून आऊट

मोईनच्या चेंडूवर मार्शला ऋतुराज गायकवाडने झेलबाद केले. सीमारेषेवर ऋतुराजने मार्शचा झेल घेतला. त्याला 20 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा करता आल्या.

मोईनने एका षटकात दोन बळी घेतले

मोईन अलीने तीन विकेट घेत सामन्याचे चित्र फिरवले. त्याने दिल्लीच्या डावाच्या आठव्या षटकात मिचेल मार्शला (25) ऋतुराज गायकवाडकडून झेलबाद केलं. यानंतर मोईनने दहाव्या षटकात दोन बळी घेतले. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋषभ पंतला बोल्ड केलं. पंतला 11 चेंडूत 21 धावा करता आल्या.पंतला 11 चेंडूत 21 धावा करता आल्या. मोईनच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रिपल पटेलनं षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर रिपल पुन्हा एकदा मोठ्या शॉटच्या दिशेनं सरकला पण कॉनवेने त्याचा सर्वोत्तम झेल सीमारेषेवर घेतला.

दिल्लीला आठवा धक्का

99 धावांच्या स्कोअरवर दिल्लीला आठवा धक्का बसला. सिमरजित सिंगने कुलदीप यादवला रॉबिन उथप्पाकडून झेलबाद केले. कुलदीप सतरा चेंडूत पाच धावा करून बाद झाला.

सीएसकेच्या 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा

पहिले फलंदाजी करताना सीएसकेच्या ऋतुराज गायकवाडने 41 धावा आणि डेव्हॉन कॉनवेनं 87 धावा करत 110 धावांची भागीदारी करून चेन्नईला झंझावाती सुरुवात करून दिली. यानंतर दुबेनं 32 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी CSK अडखळला, ज्यामुळे संघ केवळ 208 धावांपर्यंत पोहोचू शकला. धोनीने 8 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळली. दिल्लीकडून नोरखियाने तीन तर खलील अहमदने दोन गडी बाद केले. चेन्नईने या मोसमात चौथ्यांदा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. चेन्नईनं 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या असून दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

ऋतुराजचे अर्धशतक हुकले, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अखेरच्या षटकात षटकार मारून हॅट्ट्रिक

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात षटकार मारून हॅट्ट्रिक साधली. त्याने तिसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीविरुद्ध मिड-विकेटवर षटकार ठोकला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या राहुल त्रिपाठीच्या हातात कार्तिकचा शॉट गेला. पण चेंडू त्याच्या हातातून गेला आणि बंगळुरूला 6 धावा मिळाल्या. पुढच्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार मारला. फारुकीने संथ तिसरा चेंडू टाकला पण कार्तिकने तो डीप मिड-विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवला. तो इथेच थांबला नाही आणि ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला.

6, 6, 6 अन् चौकार, VIDEO पाहण्याासाठी इथे क्लिक करा

डेव्हॉन कॉनवेचं अर्धशतक

डेव्हॉन कॉनवेनं आयपीएल कारकिर्दीतील तिसरं अर्धशतक झळकावलंय. त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने हैदराबाद आणि बंगळुरूविरुद्धही अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे, चायनामन गोलंदाज कुलदीप यादवसाठी हा सामना आतापर्यंत काही खास ठरला नाही. त्याने दोन षटकात 34 धावा दिल्या आहेत. या दोन्ही षटकात कॉनवेने त्याला फटकेबाजी केली. कुलदीप डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने या षटकात 18 धावा दिल्या. कॉनवेने शेवटच्या तीन चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याचवेळी कुलदीपच्या 10व्या षटकात 16 धावा आल्या. या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर कॉनवेने सलग तीन चौकार मारले.

डेव्हिडचं तिसरं अर्धशतक, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

धोनी नाबाद राहिला

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आठ चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. धोनीने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले.

धोनीचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कॉनवे शतक हुकलं

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का 17व्या षटकात 169 धावांवर बसला. खलील अहमदने डेव्हन कॉनवेला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. कॉनवे शतक हुकलं. तो 49 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. कॉनवेनं आपल्या खेळीत सात चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने शिवम दुबेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली.

कॉनवेची विकेट गेली, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.