Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 2nd Test : 91 वर्षात 12 बॅट्समन फेल, आज चेतेश्वर पुजारा तो इतिहास बदलून दाखवेल का?

IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया सीरीजमधील आपली आघाडी वाढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी नागपूर कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेणं, हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असेल.

IND vs AUS 2nd Test : 91 वर्षात 12 बॅट्समन फेल, आज चेतेश्वर पुजारा तो इतिहास बदलून दाखवेल का?
Cheteshwar pujaraImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:23 AM

IND vs AUS 2nd Test : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आजपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. दोन्ही टीम्ससाठी आजचा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडिया सीरीजमधील आपली आघाडी वाढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी नागपूर कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेणं, हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असेल. त्याशिवाय हा कसोटी सामना टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारासाठी खास आहे. चेतेश्वर पुजाराच्या करिअरमधील हा 100 वा कसोटी सामना आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा भारताचा 13 वा खेळाडू आहे.

  1. भारताचे विद्यमान हेड कोच राहुल द्रविड यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2006 साली करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळला होता. पहिल्या डावात त्याने 52 धावा केल्या. दुसऱ्या डावात द्रविडने फक्त 9 धावा केल्या होत्या.
  2. राहुल द्रविड सारखीच व्हीव्हीएस लक्ष्मणची स्थिती होती. त्यांनी 2008 साली नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला होता. त्यांनी पहिल्या डावात 64 आणि दुसऱ्याडावात फक्त 4 धावा केल्या होत्या.
  3. विराट कोहलीने आपला 100 वा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये खेळला. पहिल्या डावात त्याने 45 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगची संधीच मिळाली नाही.
  4. विरेंद्र सेहवाग 2012 साली आपल्या करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळला. मुंबईत इंग्लंड विरुद्ध हा सामना झाला. त्यावेळी सेहवागने पहिल्या इनिंगमध्ये 30 आणि दुसऱ्या डावात फक्त 9 धावा केल्या.
  5. स्पिन गोलंदाज हरभजन सिंह वर्ष 2013 मध्ये चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला. मॅचच्या पहिल्या डावात एक विकेट आणि दुसऱ्याडावात त्याने फक्त 3 विकेट काढल्या.
  6. इशांत शर्मा 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळला. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ही मॅच झाली. पहिल्या डावात त्याने एक विकेट काढली. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजीची संधीच मिळाली नाही.
  7. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली 2007 साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळला. पहिल्या डावात त्याने 43 आणि दुसऱ्याडावात 15 धावा केल्या.
  8. दिलीप वेंगसरकर मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळले होते. 1988 साली हा सामना झाला. वेंगसरकरांनी पहिल्या डावात 25 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये ते खातही उघडू शकले नाहीत.
  9. सुनील गावस्कर 1984 साली लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळले. त्यांनी मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 48 आणि दुसऱ्या डावात 37 धावा केल्या.
  10. भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव पाकिस्तान विरुद्धच 100 वा कसोटी सामना खेळले. कराचीमध्ये ही टेस्ट मॅच झाली. त्यांनी सात विकेट घेतले. याशिवाय पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा केल्या.
  11. सचिन तेंडुलकरने त्याच्या 100 व्या कसोटीत अर्धशतक झळकवल होतं. 2002 साली इंग्लंड विरुद्ध ओव्हल मैदानात हा सामना झाला. या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये सचिनने 54 धावा केल्या. भारताने दुसऱ्यांदा बॅटिंग केली नाही.
  12. भारताचा स्पिन गोलंदाज अनिल कुंबळेसाठी 100 वा कसोटी संस्मरणीय होता. श्रीलंकेविरुद्ध 2005 साली कुंबळे आपल्या करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळला. पहिल्या इनिंगमध्ये दोन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतले होते.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.