Chetan Sharma यांची एक मोठी मिस्टेक, आता कोट्यवधींच नुकसान, जाणून घ्या किती होता पगार?
टीम इंडियाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. चेतन शर्मा यांनी विराट-रोहितच भांडण, विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवणं, जसप्रीत बुमराहची दुखापत या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा सध्या मोठ्या अडचणीत आहेत. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम ब्लंडर हो गया…गंगाजल चित्रपटातील हा डायलॉग चेतन शर्मा यांना सध्या तंतोतंत लागू पडतोय. चेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन झालं. त्यात त्यांनी टीम इंडियाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. चेतन शर्मा यांनी विराट-रोहितच भांडण, विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवणं, जसप्रीत बुमराहची दुखापत या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे त्यांची खुर्ची जाऊ शकते.
चीफ सिलेक्टरला किती वेतन मिळतं?
सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय चेतन शर्मा यांच्या विषयात लवकरच कारवाई करु शकते. त्यांना आपली चीफ सिलेक्टर पदाची खुर्ची देखील गमवावी लागेल. चेतन शर्मा यांची खुर्ची गेली, तर मात्र या माजी खेळाडूच मोठ नुकसान होऊ शकतं. चेतन शर्मा यांना बीसीसीआयकडून घसघशीत पगार मिळतो. चीफ सिलेक्टरला किती वेतन मिळतं? ते जाणून घेऊया.
फक्त पैसाच नाही, बरच काही जाऊ शकतं
चेतन शर्मा यांना बीसीसीआय वर्षाला 1 कोटी 25 लाख रुपये सॅलरी देते. क्रिकेट विश्वातील कुठल्याही बोर्डाच्या चीफ सिलेक्टरला मिळणारा, हा सर्वात जास्त पगार आहे. चेतन शर्मा यांच्यावर कारवाई झाल्यास, त्यांना वेतनावर पाणी सोडावं लागेल. फक्त पैसाच नाही, भारतीय चीफ सिलेक्टरकडे बरीच पावर असते. भारतीय टीमच्या सिलेक्शनमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. चेतन शर्मा यांच्याकडून सर्व अधिकार हिरावले जाऊ शकतात. चेतन शर्माने काय खुलासे केले?
खेळाडू 80 ते 85 टक्के फिट असताना, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शन घेतात, असं स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी म्हटलय. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजच्यावेळी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावरुन त्याच्यात आणि टीम मॅनेजमेंटमध्ये मतभेद होते. बुमराह अजून टीमच्या बाहेर आहे. बुमराह अजूनही टीम बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची सीरीज आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरीजमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता नाहीय. माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यामध्ये अहंकाराची लढाई होती, असं चेतन शर्मा म्हणाले. कोहली कॅप्टनशिपच्या वादात खोटं बोलला होता असही चेतन शर्मा म्हणाले.