Chetan Sharma : BCCI अध्यक्ष चीफ सिलेक्टरवर Action घेणार? स्टिंग ऑपरेशनमुळे जाऊ शकते नोकरी

Chetan Sharma : हेच चेतन शर्मा अखेर कॅमेऱ्यासमोर बोलले. पण ते ज्या पद्धतीने कॅमेऱ्यासमोर आले, त्याने अनेकांना धक्का बसलाय. एका न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.

Chetan Sharma : BCCI अध्यक्ष चीफ सिलेक्टरवर Action घेणार? स्टिंग ऑपरेशनमुळे जाऊ शकते नोकरी
chetan sharmaImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:10 AM

नवी दिल्ली : सध्या चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीच्या प्रमुखपदाची धुरा आहे. ते टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर आहेत. टीमची निवड केल्यानंतर ते पत्रकार परिषद घेत नाहीत, म्हणून ते क्रिकेट पत्रकार आणि फॅन्सच्या निशाण्यावर असतात. मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होतो. हेच चेतन शर्मा अखेर कॅमेऱ्यासमोर बोलले. पण ते ज्या पद्धतीने कॅमेऱ्यासमोर आले, त्याने अनेकांना धक्का बसलाय. एका न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांची नोकरी धोक्यात आली आहे. कारण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड या स्टिंग ऑपरेशनची दखल घेऊ शकते.

बीसीसीआयच्या अडचणी वाढवल्या

मागच्याच महिन्यात चेतन शर्मा यांची सीनियर सिलेक्शन कमिटीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये टीम इंडियातील खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात अनेक दावे केले आहेत. बोर्ड विरुद्ध विराट कोहली या मुद्यावरही कथित भाष्य केलं आहे. यातून त्यांनी बीसीसीआयच्या अडचणी वाढवल्या आहेत.

BCCI कारवाई करणार?

पीटीआयच्या वृत्तानुसार, BCCI या मुद्यावर लक्ष ठेवून आहे. कारण नॅशनल सिलेक्टर्स बोर्डाशी करारबद्ध असतात. त्यांना मीडियासोबत बोलण्याची परवानगी नसते. पीटीआयने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जय शाह घेणार निर्णय

“BCCI सचिव जय शाह चेतन शर्माच्या भविष्यासंबंधी निर्णय घेतील. चेतन अंतर्गत चर्चांचा खुलासा करतो, हे समजल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा त्यांच्यासोबत निवड समितीच्या बैठकीत पुन्हा बसतील का?” असं BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.

चेतन शर्मा यांचे मोठे आरोप

स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंवर अनेक आरोप केलेत. हेड कोच राहुल द्रविड आणि विराट कोहलीसोबतच्या गोपनीय चर्चेचाही खुलासा केलाय. खेळाडू 80 ते 85 टक्के फिट असताना, लवकरात लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शन घेतात असा दावा चेतन शर्मा यांनी केलाय.

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलं. त्यावरुन टीम मॅनेजमेंट आणि त्यांच्यामध्ये मतभेद होते असा खुलासा चेतन शर्मा यांनी केलाय. चेतन शर्मा भारताकडून 23 कसोटी सामने खेळले आहेत. गांगुली-विराटमध्ये अहंकाराची लढाई

बुमराह अजूनही टीम बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची सीरीज आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरीजमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता नाहीय. माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यामध्ये अहंकाराची लढाई होती, असं चेतन शर्मा म्हणाले. कोहली कॅप्टनशिपच्या वादात खोटं बोलला होता असही चेतन शर्मा म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.