AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये वादाची ठिणगी, मिचेलच्या टीकेनंतर वॉर्नर गटाकडूनही प्रत्युत्तर

पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जॉनसन मिचेल केलेल्या टीकेनंतर आता डेविड वॉर्नरच्या मॅनेजरनही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वाद आणखी शिगेला जाणार यात शंका नाही. माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसननं डेविड वॉर्नरला कसोटी संघात घेण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये वादाची ठिणगी, मिचेलच्या टीकेनंतर वॉर्नर गटाकडूनही प्रत्युत्तर
| Updated on: Dec 04, 2023 | 9:51 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. आजी माजी क्रिकेटपटूंमधील कलगीतुऱ्यामुळे वाद पेटला आहे. ऑस्ट्रेलिया माजी वेगवान गोलंदाज मिचेल मार्श याने लिहिलेल्या कॉलमध्ये वॉर्नरवर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच त्याची निवड कसोटी संघात केल्यावरून आश्चर्य व्यक्त केलं. मिचेल जॉनसन आणि डेविड वॉर्नर या दोघांनी जवळपास सहा वर्षे एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. यात एशेस 2013/14 आणि वर्ल्डकप 2015 जिंकला होता. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण आता या दोघांमध्ये बिनसल्याचं दिसत आहे. डेविड वॉर्नरचा फॉर्म आणि 2018 मधील बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे त्याने त्याच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात 12 महिन्यांची डेविड वॉर्नरवर बंदी घालण्यात आली हती. तसेच टीम ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करता येणार नाही असं बंधन घातलं होतं. आता मिचेल जॉनसनने डेविड वॉर्नरवर उघडपणे टीका केली असून त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आता या वादात वॉर्नरचे मॅनेजर जेम्स एरस्काइन याने उडी घेतली आहे.

“मी तुम्हाला सांगतो कोणालाही हेडलाईन मिळू शकते. मिचले जॉनसनला हे माहिती नाही की डेविड वॉर्नर अजूनही कसोटी संघाचा भाग आहे. डेविड वॉर्नर आजही ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम ओपनर आह. डेविड वॉर्नरची निवड लॉजिकल आहे. मिचेल जॉनसन ज्या पद्धतीने बोलतो ते सर्व संभ्रम निर्माण करणारं आहे.”, असं डेविड वॉर्नरचा मॅनेजर जेम्स एर्स्किननं सांगितलं.

उस्मान ख्वाजाने सांगितलं की, “डेविड वॉर्नरन आणि स्टीव्ह स्मिथ आमच्यासाठी हिरो आहेत. दोघंही एक वर्ष क्रिकेटपासून दूर होते. त्यांनी जो गुन्हा केला त्याची त्यांना शिक्षा मिळाली आहे. कोणंच परफेक्ट नाही. मग तो डेविड वॉर्नर असो की स्टीव्ह स्मिथ. डेविड वॉर्नरने क्रिकेटसाठी जे काही केलं त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहीजे. जॉनसनचं डेविड वॉर्नर आणि सँडपेपर स्कँडलमध्ये सहभागी असलेले हिरो नाही. या मताशी मी सहमत नाही.”

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.