Mohammed Shami | मोहम्मद शमी याला मोठा झटका, न्यायालयाकडून पत्नी हसीन जहाँबाबत मोठा निर्णय
कोलकातातील एका न्यायालयाने टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसनी जहाँ यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या..
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान आणि स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ गही कायम चर्चेत असते. पती मोहम्मद शमीसोबत असलेल्या वादामुळे हसीन ही गेल्या अनेक वेळेपासून मुलीसोबत वेगळी राहतेय. हसीन अभिनेत्री आहे. कोलकातातील एका न्यायालयाने शमी पती-पत्नीबाबत एक निर्णय सुनावला आहे.
न्यायालयाचा मोठा निर्णय
कोलकाताच्या न्यायालयाने सोमवारी शमीला त्याच्या विभक्त राहणाऱ्या पत्नीला दरमहा 1 लाख 30 हजार रुपये खर्चासाठी देण्याचे आदेश दिले आहे. या 1 लाख 30 हजार रुपयांमध्ये हसीनला 50 हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी आहेत. तर उर्वरित 80 हजार रुपये हे मुलीच्या देखभालीसाठी आहेत.
हसीनची मागणी काय होती?
हसीनने 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये 7 लाख रुपये हे वैयक्तिक खर्च तर मुलाच्या संगोपनासाठी 3 लाख रुपये अशी विभागणी केली होती. हसीनची वकील मृगांका मिस्त्रीने न्यायलयाला विनंती केली होती की, 2021-22 या आर्थिक वर्षाात शमीच्या आयकर रिर्टननुसार, वार्षिक उत्पन्न हे 7 कोटींपेक्षा अधिक होतं. याच आधारावर 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करण्यात आली होती.
शमीच्या वकीलचा दावा
न्यायालयात शमीची बाजू वकील सेलिम रहमान यांनी मांडली. हसीन स्वत: मॉडेल म्हणून काम करत ठराविक रक्कम मिळवत होती. त्यामुळे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागणं योग्य नाही. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर शमीने 1 लाख 30 रुपये मासिक पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने सोमवारी घेतला. मात्र पोटगी आणखी जास्त असती तर आणखी दिलासा मिळाला असता, असं हसीन म्हणाली. तर शमीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.