Jos buttler : ‘हो, एका भारतीय स्टारसमोर माझी बोलती बंद होते’, जोस बटलरची कबुली

Jos buttler : खास चर्चेमध्ये जोस बटलरने काही गोष्टींचा उलगडा केला. क्रिकेट विश्वात कुठल्या गोलंदाजाचा सामना करणं, सर्वात जास्त अडचणीच वाटतं, त्याबद्दल बटलरने सांगितलं. जोस बटलरवर एका भारतीय गोलंदाजाची दहशत आहे.

Jos buttler : 'हो, एका भारतीय स्टारसमोर माझी बोलती बंद होते', जोस बटलरची कबुली
jos buttler Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 7:41 AM

नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट टीमचा विद्यमान कॅप्टन जोस बटलर याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. क्रिकेट विश्वात त्याच्या स्फोटक बॅटिंगचे अनेक चाहते आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने जबरदस्त बॅटिंग केली. त्याने थेट शतक ठोकलं. पाचव्या नंबरवर बॅटिंग करताना त्याने 127 चेंडूंचा सामना केला. 103.15 च्या स्ट्राइक रेटने 131 धावांची शतकी खेळी केली. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि सात षटकार मारले. बटलर आणि मलानच्या जबरदस्त बॅटिंगमुळे इंग्लंडने तिसरा वनडे सामना 59 धावांनी जिंकला.

भारताच्या ‘या’ बॉलरची जोस बटलरवर दहशत

ESPN सोबत खास चर्चेमध्ये जोस बटलरने काही गोष्टींचा उलगडा केला. क्रिकेट विश्वात कुठल्या गोलंदाजाचा सामना करणं, सर्वात जास्त अडचणीच वाटतं, त्याबद्दल बटलरने सांगितलं. जोस बटलरवर एका भारतीय गोलंदाजाची दहशत आहे. त्याचं नाव आहे, जसप्रीत बुमराह. जोस बटलरच्या मते, जसप्रीत बुमराह क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धोकादायक गोलंदाज आहे.

क्रिकेट करिअरमध्ये तुला कुठला बॉलर सर्वात जास्त वेगवान वाटला, असा प्रश्न बटलरला विचारण्यात आला. त्यावर त्याने जसप्रीत बुमराहच नाव घेतलं. T20 फॉर्मेटमध्ये बुमराहने चारवेळा बटलरची विकेट काढलीय.

5 नंबर खास

बटलर सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 131 धावा केल्या. वनडे करिअरमधील त्याचं हे 11 व शतक आहे. वनडे फॉर्मेटमध्ये पाचव्या नंबरवर किंवा त्यापेक्षा खाली येऊन, सेंच्युरी मारणारा बटलर क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. पाचवा नंबर किंवा त्यापेक्षा खाली येऊन त्याने एकूण आठ शतकं झळकवली आहेत. बटलरच्या नंतर धोनी आणि युवराज सिंगच नाव येतं. त्यांनी पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या नंबरवर येऊन सात-सात शतकं झळकवली आहेत. त्यानंतर एबी डिविलियर्स, इयन मॉर्गन आणि सायमंड्स हे दिग्गज आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.