Hardik Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे असणार? पंड्या पोस्टमध्ये स्पष्टच म्हणाला…

Hardik Natasa Divorce : वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दोघांनाही एक मुलगा असून तो कोणाकडे राहणार याबाबत पंड्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे.

Hardik Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे असणार? पंड्या पोस्टमध्ये स्पष्टच म्हणाला...
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 11:55 PM

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता दोघांनीही भावनिक पोस्ट करत याबाबतची घोषणा केली. हार्दिक पंड्या आणि नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नताशा आणि हार्दिक पंड्याचा लग्नाला 4 वर्षे झाली असून दोघांनाही अगस्त्य नावाचा नावाचा मुलगा आहे. दोघेही वेगळे झाल्यावर आता मुलगा कोणाकडे राहणार असा प्रश्न पडला आहे. याबाबत हार्दिक पंड्या पोस्टमध्ये काय म्हणाला ते जाणून घ्या.

आम्ही गेली 4 वर्षे एकत्र राहत असून आता दोघेही एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. दोघांनीही हे नातं टिकण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न केले. परंतु पण आता दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटत आहे. आम्ही एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण आणि एकमेकांविषयी असलेला आदर, आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो होतो. त्यामुळे हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं, असं हार्दिक आणि नताशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये मुलाबाबतही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आमचा मुलगा अगस्त्य हा कामय दोघांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते सहपालक म्हणून करू. आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. तुम्ही या कठीण काळात आम्हाला समजून घेताल अशी सर्वांना विनंती करतो, असंही दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हार्दिक पंड्या आणि नताशाने लॉकडाऊनवेळी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर 30 जुलै 2020 ला दोघेही आई-बाबा झाले होते. त्यांनी आपल्या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवलं होतं, पंड्या आणि नताशाने ख्रिश्चन रितीरिवाजानुसार परत एकदा फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न केलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.