IPL साठी नाही, पण फाफ डुप्लेसी पुन्हा चेन्नई सुपर किंग्सकडून, तर राशिद खान Mumbai Indians कडून खेळणार

आयपीएल 2022 (IPL 2022) आधी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपला चॅम्पियन फलंदाज फाफ डुप्लेसीची (faf du plessis) साथ सोडली होती.

IPL साठी नाही, पण फाफ डुप्लेसी पुन्हा चेन्नई सुपर किंग्सकडून, तर राशिद खान Mumbai Indians कडून खेळणार
faf du plesisImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 1:18 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) आधी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपला चॅम्पियन फलंदाज फाफ डुप्लेसीची (faf du plessis) साथ सोडली होती. डुप्लेसी 15 व्या सीजन मध्ये आरसीबीचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीची टीम प्लेऑफ पर्यंत पोहोचली. पण आता पुन्हा एकदा फाफ डुप्लेसीच चेन्नई सुपरकिंग्स मध्ये पुनरागमन झालय. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं शक्य आहे? पण चेन्नई सुपर किंग्स मॅनेजमेंटने आयपीएल नाही, तर सीएसए टी 20 लीगसाठी डुप्लेसी सोबत करार केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डुप्लेसीला चेन्नई सुपरकिंग्स मॅनेजमेंटने आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. पुढच्यावर्षी पासून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची टी 20 लीग सुरु होत आहे. या लीग मधील सर्व 6 संघांचे मालकी हक्क आयपीएल संघांकडे आहेत.

लियाम लिव्हिंगस्टोन मुंबई इंडियन्सकडून खेळणार

सीएसए टी 20 लीग मध्ये मुंबई इंडियन्सनेही एक मोठ पाऊल उचललं आहे. राशिद खानला आपल्या संघासोबत जोडलं आहे. मुंबईने आणखी तीन खेळाडूंना आपल्या टीमसोबत जोडलं आहे. मुंबई इंडियन्सने लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा आणि सॅम करनचा स्क्वाड मध्ये समावेश केलाय.

मार्की खेळाडू म्हणून कोणाची निवड?

दिल्ली कॅपिटल्सने एनरिक नॉर्खियाला आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. सनरायजर्स हैदराबादने एडेन मार्करमला आपला मार्की खेळाडू बनवलं आहे. राजस्थान रॉयल्सने जोस बटलर आणि लखनऊ सुपर जायंट्सने डी कॉकची मार्की खेळाडू म्हणून निवड केली आहे.

प्रत्येक संघात किती परदेशी खेळाडू?

सीएसए टी 20 लीग मध्ये प्रत्येक संघाला जास्तीत जास्त पाच खेळाडूंना निवडण्याचा पर्याय होता. आता अन्य खेळाडूंना ऑक्शन मध्ये विकत घेतलं जाईल. प्रत्येक संघाला 10 दक्षिण आफ्रिकन आणि 7 परदेशी खेळाडू निवडावे लागतील. प्लेइंग इलेव्हन मध्ये 7 दक्षिण आफ्रिकन आणि 4 परदेशी खेळाडू असतील.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.