IPL मध्ये वात पेटली, KKR नंतर आता धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह

कोरोनाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

IPL मध्ये वात पेटली, KKR नंतर आता धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह
CSK
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 4:07 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, आयपीएलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यातच आता कोरोनाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (Chennai Super Kings) ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. (CSK Bowling Coach Lakshmipathy Balaji And CEO Kasi Viswanathan Test COVID-19 Positive; bus cleaner Also Infected)

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत.

याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही शहरात कोरोनाचा आलेख चढता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या चिंता वाढल्या आहेत.

सध्या चेन्नई सुपरकिंग्जची टीम दिल्लीत आहे. असे म्हटले जात आहे की, विश्वनाथन, बालाजी आणि बस क्लीनरची 3 मे रोजी (आज) पुन्हा चाचणी घेण्यात आली आहे. जेणेकरुन फॉल्स पॉझिटीव्ह रिपोर्ट्सबाबतच्या शक्यता दूर होतील. या तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बायो बबलमधून बाहेर काढून 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे. तसेच लागोपाठ दोन वेळा कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच ते पुन्हा एकदा बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतील आणि आपल्या संघासोबत राहतील.

कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (varun chakravarthy) आणि संदीप वॉरियर (sandeep warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

पॅट कमिन्स आजारी?

आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

इतर बातम्या

KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, ‘राहुल तुला….’

(CSK Bowling Coach Lakshmipathy Balaji And CEO Kasi Viswanathan Test COVID-19 Positive; bus cleaner Also Infected)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.