CSK IPL 2023 : MS Dhoni चा संयम सुटला, थेट अंपायरला नडला, कशावरुन घातली हुज्जत? Video Viral

CSK IPL 2023 : प्लेऑफआधी CSK च्या कॅप्टनचा मूड खराब झाला. धोनी आणि अंपायरमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी IPL मध्ये धोनीने अंपायर बरोबर हुज्जत घातली होती.

CSK IPL 2023 : MS Dhoni चा संयम सुटला, थेट अंपायरला नडला, कशावरुन घातली हुज्जत? Video Viral
MS Dhoni IPL 2023Image Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 12:09 PM

नवी दिल्ली : एमएस धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पण काहीवेळा त्याचा संयम सुटतो. IPL मध्ये धोनी भडकल्याची अनेक उदहारण आहेत. दिल्लीमध्ये 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा असच झालं. तिथे धोनी अंपायरला नडला. धोनी आणि अंपायरमध्ये कशावरुन वाद झाला? हा प्रश्न आहे. त्यांच्यामधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मॅच दरम्यान धोनीचा मूड चांगला वाटत नव्हता. खासकरुन CSK ची गोलंदाजी सुरु असताना धोनीचा मूड चांगला नव्हता. धोनी आपल्या गोलंदाजांना सतत काही सांगत होता. त्यांना ओरडत होता. या दरम्यान धोनीचा फिल्ड अंपायर ख्रिस गैफनी यांच्याबरोबर वाद झाला.

वाद कशावरुन झाला?

नेमका वाद कशावरुन झाला, ते समजून घ्या. दिल्लीच्या इनिंगमधील 14 वी ओव्हर संपल्यानंतर हा सर्व वाद झाला. स्ट्रॅटजिक टाइम आऊट सुरु होता. या दरम्यान धोनीने अंपायरकडे चेंडू बदलण्याची मागणी केली. कारण चेंडूचा शेप खराब झाला होता. अंपायरनी CSK च्या कॅप्टनच म्हणण ऐकून चेंडू बदलला. अंपायर्सनी जो दुसरा चेंडू दिला, त्यावर धोनी खूश नव्हता.

धोनीच काय म्हणणं होतं?

याच मुद्यावरुन धोनी आणि अंपायर ख्रिस गैफनी यांच्यात वाद सुरु झाला. धोनी चेंडूवर नाराज असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. कारण तो चेंडू अंपायरला दाखवत होता. दुसरा चेंडू जो अंपायरने दिला, तो नवीन वाटत होता. धोनीला जुना चेंडू हवा होता. जितका जुना चेंडू त्याने अंपायर्सकडे दिलेला, तसाच चेंडू धोनीला अपेक्षित होता. याआधी IPL 2019 मध्ये झालेला वाद

धोनी आणि अंपायरमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी IPL 2019 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यामध्येही धोनीने अंपायर बरोबर हुज्जत घातली होती. त्यावेळी नो बॉल न देण्यावरुन धोनीने अंपायर बरोबर वाद घातलेला.

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.