CSK ला रोहित शर्मा, बुमराहसारखे प्लेयर का नकोत? धोनीचा बॉस मोठी गोष्ट गेला बोलून
IPL Auction 2024 | रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कॅप्टनशिपवरुन हटवलय. अशावेळी चेन्नई सुपर किंग्सने रोहित, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह सारख्या मुंबईच्या स्टार खेळाडून ट्रेड का केलं नाही? CSK ची यामागे काय भूमिका आहे?
IPL Auction 2024 | चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधला यशस्वी संघ समजला जातो. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली या टीमने पाचवेळा आयपीएल किताब जिंकलाय. त्याशिवाय आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचणारी ही टीम आहे. फक्त 2020 आणि 2022 मध्ये चेन्नई टीमला आयपीएलचा प्लेऑफ राऊंड गाठता आला नव्हता. आयपीएलमधील ट्रेडिग बद्दल बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं. रोहित शर्मा या सीजनमध्ये टीमच नेतृत्व करणार नाही. रोहित चेन्नईच्या टीममध्ये जाणार असं बोलल जात होतं. आता या बद्दल चेन्नई टीमच्या CEO ने मोठ वक्तव्य केलय.
CSK चा भाग राहिलेल्या आणि आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने यूट्यूब चॅनलवर प्रसन्नाला सांगितलं होतं की, “मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा किंवा जसप्रीत बुमराहला मुंबईकडून ट्रेड केलं जाऊ शकतं”
काय म्हणाले CSK चे सीईओ?
या बद्दल चेन्नई सुपर किंग्स टीमचे सीईओ काशी विश्वनाथन मोठी गोष्ट बोलून गेले. “चेन्नईच्या टीमची काही तत्व आहेत. आम्ही खेळाडूंना ट्रेड करत नाही. आमच्याकडे असे खेळाडू नाहीयत, ज्यांना आम्ही मुंबईशी ट्रेड करु. चेन्नईने मुंबईला ट्रेडसाठी विचारणा केली नाही. आमचा असा कुठलाही इरादा नाही” अस काशी विश्वनाथन म्हणाले. मुंबईने रोहितला कॅप्टनशिपवरुन हटवलं, त्यावेळी फॅन फॉलोइंगमध्ये घसरण झाली होती. रोहितचे फॅन्स नाराज झाले होते. रोहितला चेन्नईला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. सोशल मीडियावर त्या बद्दल अंदाज वर्तवले जात होते.
Mega Update🚨
Prasanna confirms in Ashwin YT video that 2 pacers from CSK might be traded for either a star Batsman(Suryakumar Yadav/Rohit Sharma) or a star Indian bowler(Jasprit Bumrah). pic.twitter.com/bUcSAQCN4x
— 𝐒𝐞𝐫𝐠𝐢𝐨 Das (@SergioCSKK) December 18, 2023
रोहितने जिंकायला शिकवलं?
रोहित असा कॅप्टन आहे, ज्याने मुंबईला जिंकायला शिकवलं. रोहित वर्ष 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनला. त्याचवर्षी मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2015, 2017, 2019, 2020 मध्ये विजेतेपद मिळवलं. पांड्या सुद्धा रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळायचा. हार्दिक 2015 साली मुंबईच्या टीममध्ये आला. 2022 च्या मेगा ऑक्शनआधी मुंबईने पांड्याला रिलीज केलं. त्याला गुजरात टायटन्सने विकत घेऊन कॅप्टन बनवलं. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने डेब्युमध्येच चॅम्पियनशिप जिंकली. वर्ष 2022 मध्ये GT ला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.