AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI IPL 2023 : ‘मला समोर मुंबईची टीम नकोय’, फायनलआधीच CSK घाबरली? दिग्गजाच्या वक्तव्याने खळबळ

MI IPL 2023 : फायनल गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सशी भिडावं लागणार आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना करण्याची आमची अजिबात इच्छा नाही, असं चेन्नईचा माजी क्रिकेटर म्हणाला.

MI IPL 2023 : 'मला समोर मुंबईची टीम नकोय', फायनलआधीच CSK घाबरली? दिग्गजाच्या वक्तव्याने खळबळ
| Updated on: May 25, 2023 | 1:09 PM
Share

चेन्नई : IPL 2023 ची फायनल 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. दुसऱ्याबाजूला मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला हरवून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने विजय मिळवला, तर ते थेट फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला भिडतील. फायनलमध्ये मुंबईचा सामना करण्याची आमची अजिबात इच्छा नाही, असं चेन्नईचा माजी क्रिकेटर म्हणाला.

ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून दीर्घकाळ खेळलाय. फायनलमध्ये आमची मुंबई इंडियन्सशी गाठ पडावी, अशी माझी अजिबात इच्छा नाही, असं ब्राव्हो म्हणाला. “माझा मित्र कायरन पोलार्डला सुद्धा या बाबत माहित आहे. माझ्याकडून सर्वच टीम्सना ऑल द बेस्ट. फायनलमध्ये कोण प्रवेश करणार? यावर आमचं लक्ष आहे” सोशल मीडियावर ब्राव्होचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय

MI-CSK आतापर्यंत किती वेळा फायनलमध्ये आमने-सामने आलेत?

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलच विजेतेपद मिळवलय. चेन्नईची टीम 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरलीय. मुंबई आणि चेन्नईच्या टीम आतापर्यंत 4 वेळा फायनलमध्ये आमने-सामने आल्या आहेत. यात मुंबई इंडियन्सची टीम 3 वेळा, तर चेन्नईची टीम फक्त एकदा जिंकलीय. चेन्नईच्या टीमने 2010 मध्ये मुंबईला हरवून विजेतेपद मिळवलं होतं. मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2019 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला हरवलय. क्वालीफायर-2 मध्ये MI-GT सामना

26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर-2 चा सामना होणार आहे. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सची टीम मागचे दोन सामने जिंकून फॉर्ममध्ये आहे. गतविजेत्या गुजरातला क्वालिफायर 1 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही टीम्ससाठी फायनलमध्ये प्रवेश करण्याआधी ही मॅच महत्वाची आहे.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.