IPL 2023 Final Live Streaming : फायनल मॅच कुठे, किती वाजता पाहायची ?

IPL 2023 Final Live Streaming : आयपीएल 2023 हा 16 वा सीजन आहे. या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यातील तपशील

IPL 2023 Final Live Streaming : फायनल मॅच कुठे, किती वाजता पाहायची ?
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह आपला विक्रम आणखी भक्कम केलाय.
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:14 PM

अहमदाबाद : आयपीएल 2023 स्पर्धेतील जेतेपदासाठी आता चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा, तर गुजरात टायटन्सला दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या सामन्यात तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेची सुरुवात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने झाली होती. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून विजय मिळवला होता.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स दुसऱ्यांना क्वॉलिफायर 1 फेरीत आमनेसामने आले. या सामन्यात चेन्नईने पराभवाची परतफेड करत अंतिम फेरी गाठली. चेपॉक मैदानात चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमवून 172 धावा केल्या आणि 173 धावांचं आव्हान दिल्या. पण गुजरातचा संघ 20 षटकात सर्वगडी बाद 157 धावा केल्या. चेन्नईने गुजरातला 15 धावांनी पराभूत केलं होतं. आता अंतिम फेरीत पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे.

IPL 2023 ची फायनल मॅच कधी?

आयपीएलचा हा 16 वा सीजन आहे. IPL 2023 ची फायनल मॅच 28 मे रविवारी होणार आहे.

सामना कुठे खेळवण्यात येणार?

IPL 2023 चा फायनल सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघता येणार?

IPL 2023 चा फायनल सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहता येणार आहे.

डिजीटल स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

IPL 2023 चा फायनल सामना लॅपटॉप आणि मोबाईलवर जिओ एपच्या माध्यमातून पाहता येईल.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.