IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, नक्की काय?
Indian Cricket Team Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप मोहिमेची विजयाने सुरुवात करणाऱ्या टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जाणून घ्या नक्की असं काय झालंय?
धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धएतील सातवा सामना हा 10 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशवर 137 धावांच्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने यासह वर्ल्ड कपधील विजयाचं खात उघडलं. इंग्लंडने बांगलादेशला विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 48.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 227 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून लिटॉन दास याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर विकेटकीपर बॅट्समन मुशफिकुर रहीम याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर तॉहिद हृदॉय याने 39 धावांचं योगदान दिलं. मात्र इतरांनी इंग्लंडसमोर गुडघे टेकले.
इंग्लंडकडून रिस टॉपली याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स याने 2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सॅम करन, मार्क वूड, आदिल रशिद आणि लियाम लिविंगस्टोन या चौकडीने 1-1 विकेट घेतली. इंग्लंडच्या या विजयामुळे आणि बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाला चांगला फायदा झाला आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाला या सामन्याआधी आनंदाची बातमी मिळाली आहे.
इंग्लंड बांगलादेश विरुद्धच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी पोहचली आहे. तर बांगलादेशची पराभवामुळे चौथ्या स्थानावरुन थेट सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. इथे बांगलादेश पराभूत झाल्याने टीम इंडियाने थेट पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी पोहचली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवूनही पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र इंग्लंडच्या विजयामुळे टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.
इंग्लंड पहिल्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी
A win against Bangladesh helps England up to fifth place on the #CWC23 points table 🏏
Details 👇#ENGvBANhttps://t.co/JGuxZHtW8A
— ICC (@ICC) October 10, 2023
बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, नजमुल होसेन शांतो, तानझीद हसन, तौहीद, महमदुल्लाह रियाद, मुशाफिकूर रहिम (विकेटकीपर), मेहेंदी हसन, तंझीम साकीब, नासुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि मुस्तफीझूर रहमान.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, बेन स्टोक्स, गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली आणि रीस टोपली.