VIDEO – David miller ने काय कॅच पकडली राव, तुम्ही सुद्धा तोंडभरुन कौतुक कराल
पहिल्याच सीजनमध्ये गुजरात टायटन्सने आयपीएलच विजेतेपद पटकावलं. यात डेविड मिलरची भूमिका महत्त्वाची होती. सध्या डेविड मिलर दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये खेळतोय.
डरबन – T20 क्रिकेटमध्ये डेविड मिलरच्या नावाची एक दहशत आहे. स्फोटक फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. क्रिकेटच्या या फॉर्मेटमधील तो एक उत्तम फिनिशर आहे. मागच्यावर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून तो खेळला होता. त्यावेळी त्याने शानदार बॅटिंगच कौशल्य दाखवलं होतं. पहिल्याच सीजनमध्ये गुजरात टायटन्सने आयपीएलच विजेतेपद पटकावलं. यात डेविड मिलरची भूमिका महत्त्वाची होती. सध्या डेविड मिलर दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये खेळतोय. राजस्थान रॉयल्सची फ्रेंचायजी टीम पार्ल रॉयल्सच मिलर प्रतिनिधीत्व करतोय.
करिअरच्या शेवटच्या टप्प्यात
मिलरने रविवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये जबरदस्त कॅच पकडली. मिलर आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. ही कॅच पकडून त्याने आपण अजूनही सर्वोत्तम क्रिकेट खेळू शकतो, हे त्याने दाखवून दिलय. त्याचा फिटनेसही शानदार आहे.
एकाहाताने पकडली जबरदस्त कॅच
कॅपिटल्सची टीम या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत होती. टीमने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विल जॅक्सच्या रुपात पहिला विकेट गमावला. त्यानंतर कुसल मेंडिस क्रीजवर आला. डेविड मिलरने मेंडिसची चांगली सुरुवात मोठ्या इनिंगमध्ये बदलणार नाही, याची काळजी घेतली. तबरेज शम्सी इनिंगची आठवी ओव्हर टाकत होता. मेंडिस समोर होता. शम्सीच्या चेंडीवर मेंडिसने मिडविकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू वर आला व बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत गेला.
It’s been a while since we’ve had a clean, 1 handed catch from the crowds ? Looks like David Miller decided to show the Boland Park faithful how to take a one-hander if they want to stand a chance at the #Betway Catch 2 Million ?#SA20 #PRvPC | @Betway_India pic.twitter.com/2xaKVZr3qt
— Betway SA20 (@SA20_League) January 22, 2023
सुपरमॅनसारखी डाइव्ह
चेंडू डीप स्क्वेयर लेगला अंपायरच्या जवळ गेला. मिलर शॉर्ट मिडविकेटला उभा होता. चेंडू हवेत पाहून त्याने धाव घेतली. चेंडू जमीवर पडणार होता, तितक्यात त्याने सुपरमॅनसारखी डाइव्ह मारुन एकाहाताने जबरदस्त कॅच घेतली. ही कॅच पाहून स्वत: मेंडिसही हैराण झाला. त्याला निराश मनाने पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. मेंडिसने 26 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारुन 37 धावा केल्या. अजून जलवा दाखवू शकलेला नाही
मिलरने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला किताब जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण तसाच फॉर्म तो सध्या चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील T20 लीगमध्ये दाखवू शकलेला नाही. टुर्नामेंटमधील त्याचा सर्वोच्च स्कोर 42 धावा आहे. एमआय केपटाऊन विरोधात त्याने या धावा केल्या होत्या.