DC vs LSG : 6,6,6,6,6,6, मिचेल मार्शचा धमाका, दिल्लीविरुद्ध विस्फोटक खेळी
Mitchell Marsh DC vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा स्टार ऑलराउंडर मिचेल मार्श याने दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध मोहिमेतील पहिल्याच सामन्यात झंझावाती खेळी केली आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात विशाखापट्टणम येथे सामना खेळवण्यात येत आहे. याआधीच्या 3 पैकी 2 सामन्यात क्रिकेट चाहत्यांना जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. तशीच फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्यात पाहायला मिळाली आहे. लखनौचा ऑलराउंडर मिचेल मार्श याने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत चाबूक बॅटिंग केली आहे. मिचेल मार्श याने दिल्लीविरुद्ध 200 च्या स्ट्राईक रेटने 72 धावांची झंझावाती खेळी केली.
मिचेल मार्श याने लखनौच्या डावातील सातव्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. मार्शने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मार्शने या खेळीत 4 षटकार आणि 5 चौकार लगावले. मार्शने 238.10 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. मार्शने अर्धशतकानंतर फटकेबाजी अशीच कायम ठेवली. मार्शने संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. मार्शला शतक करण्याची संधी होती. मात्र मार्शला शतकापर्यंत पोहचता आलं नाही. दिल्लीने मार्शला आधीच रोखलं. मुकेश कुमार याने निर्णायक क्षणी मिचेल मार्श याला ट्रिस्टन स्टब्स याच्या हाती कॅच आऊट केलं.
मिचेल मार्श याने 36 बॉलमध्ये 72 रन्स केल्या. मार्शने 200 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. मार्शने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 12 चेंडूत 60 धावा केल्या. मार्शच्या या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारंचा समावेश होता.
दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी
दरम्यान मिचेल मार्श आणि निकोलस पूरन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. एडन मारक्रम याच्या रुपात लखनौने 46 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर निकोलस पूरन मैदानात आला. त्यानंतर पूरन आणि मार्श या दोघांनी 44 चेंडूमध्ये 87 धावांची भागीदारी केली.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.