DC vs MI 2023 : वीजेचा वेग,अर्जुनासारखा नेम आणि खेळ खल्लास, मुंबईच्या 22 वर्षाच्या मुलाची कमाल VIDEO
DC vs MI IPL 2023 : मुंबईकडून चालू सीजनमध्ये त्याने डेब्यु केलाय. पदार्पणातच त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. त्याने ज्या अचूक थ्रो वर दिल्लीच्या फलंदाजाला रनआऊट केलं, तो विकेट मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा होता.
DC vs MI IPL 2023 : आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये अखेर मुंबई इंडियन्सला आपला पहिला विजय मिळाला. टुर्नामेंटच्या 12 व्या दिवशी 16 व्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या टीमने पहिला विजय मिळवला. मुंबईने तिसऱ्या मॅचमध्ये पहिला विजय नोंदवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने 6 विकेटने हरवलं. टीमच्या या विजयात रोहित शर्माचे फिफ्टी, पीयूष चावलाची गोलंदाजी आणि टिम डेविड-कॅमरुन ग्रीनच्या भागीदाराची चर्चा आहे. पण नेहाल वढेराच्या सर्वोत्तम फिल्डिंगच सुद्धा छोटं पण महत्वाच योगदान आहे.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर मंगळवारी पॉइंट्स टेबलमध्ये तळाला असलेल्या दोन टीम्समध्ये सामना होता. दिल्लीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 172 धावा केल्या. दिल्लीने शेवटच्या 10 चेंडूत 5 विकेट गमावले. अन्यथा ही धावसंख्या अजून मोठी असती. 5 पैकी एक विकेट नेहाल वढेराच्या उत्तम फिल्डिंगमुळे मिळाला. त्याने अचूक थ्रो वर रनआऊट केलं.
वीजेसारखा वेग
दिल्लीची बॅटिंग सुरु होती. जेसन बेहरनडॉर्फ 19 वी ओव्हर टाकत होता. त्याने पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेल आणि डेविड वॉर्नरची विकेट काढली. पुढच्या चेंडूवर कुलदीप यादव स्ट्राइकवर होता. कुलदीपने हा चेंडू शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने मारला. तो एक रन्स घेण्यासाठी पळाला. त्याचवेळी नेहाल वढेरा वीजेच्या वेगाने चेंडूच्या दिशेने झेपावला.
अर्जुनासारखा त्याचा निशाणा
वढेराने त्याच स्पीडमध्ये चेंडू पकडला आणि धावत-धावतच तिरप्या अँगलने चेंडू विकेटच्या दिशेने फेकला. अर्जुनासारखा त्याचा निशाणा एकदम अचूक होता. कुलदीप नॉन स्ट्राइकवर पोहोचण्याआधीच स्टम्पसचे बेल्स उडालेले होते.
Four wickets in the penultimate over by Jason Behrendorff including a brilliant direct-hit ??#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/CYbjXSdfR9
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
कुलदीपचा विकेट का महत्वाचा?
कुलदीप फार मोठा फलंदाज नाहीय. पण नेहालने दिल्लीचा एक विकेट घेत त्यांना एक धाव घेण्यापासून रोखलं. याचा परिणाम असा झाला की, पुढच्याच चेंडूवर दिल्लीची नववी विकेट गेली. शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 10 वा विकेट गेला. कुलदीपची विकेट गेली नसती, तर दिल्लीकडे शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी जोडी होती. त्यांनी 2, 3, धावा केल्या असत्या, तर त्या जय-पराजयामध्ये महत्वपूर्ण ठरल्या असत्या. 22 वर्षाच्या मुलाचा मुंबईकडून डेब्यु
22 वर्षाच्या नेहाल वढेराने या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केलाय. त्याला जास्त संधी मिळालेली नाही. पहिल्या मॅचमध्ये तो छोटा उपयोगी इनिंग खेळला. 101 मीटर लांब सिक्स मारुन खळबळ उडवून दिली. आता त्याने फिल्डिंगमध्ये आपली क्षमता सिद्ध केलीय.