DC vs SRH IPL 2023 : हैदराबादचा 9 धावांनी विजय, दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!
DC vs SRH IPL 2023 : आयपीएल 2023 मधल्या पहिल्या पराभवाचा वचपा अखेर हैदराबादनं काढला. पहिल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादला 7 धावांनी पराभूत केलं होतं. आता हैदराबादने दिल्लीला 9 धावांनी पराभूत केलं.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 40 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. हा सामना हैदराबादने 9 धावांनी जिंकला. या स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा होता. पण दिल्लीचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता दिल्लीचे एकूण सहा सामने उरले आहेत. हे सर्व सामने जिंकले तरी 16 गुण होतील पण रनरेटचा फटका दिल्लीला बसेल त्यामुळे आता उर्वरित सामने औपचारिकता असेल, असंच म्हणावं लागेल.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. पण दिल्लीचं संघ गडी गमवून धावा करू शकला. दिल्लीचा धावांनी पराभव झाला.या विजयासह हैदराबादला अजूनही स्पर्धेत कमबॅक करण्याची संधी आहे.
दिल्लीचा डाव
हैदराबादनं विजयासाठी दिलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव अडखळला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिशेल मार्शनं डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 112 धावांची भागीदारी केली. फिल सॉल्टने 35 चेंडूत 59 धावा, तर मिशेल मार्शने 39 चेंडूत 63 धावा केल्या. फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर मनिष पांडे आल्या पावली परत गेला. त्याने 3 चेंडूत अवघी एक धाव केली.
आक्रमक खेळी करणाऱ्या मिशेल मार्शला अकिल होसैननं तंबूचा रस्ता दाखवला. प्रियम गार्गही काही खास करू शकला नाही त्याने 9 चेंडूत 12 धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेला सरफराज खानही 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.
हैदराबादचा डाव
हैदराबादनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मासोबत आघाडीला आलेल्या मयंक अग्रवालने काही खास केलं नाही. 6 चेंडूत 5 धावा करून तंबूत परतला. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने त्याचा झेल घेतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही झटपट बाद झाला अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला.
एका बाजूने अभिषेक शर्मा खिंड लढवत होता. कर्णधार एडन मारकमही 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हॅरी ब्रूक आपलं खातंही खोलू शकला नाही. अभिषेक शर्माने तडाखेबंद फलंदाजी करत 36 चेंडूत 67 धावा केल्या. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारायच्या नादात बाद झाला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
अब्दुल समद आणि हेनरिच क्लासेन या जोडीने संघाचा डाव सावरला. मात्र 21 चेंडूत 28 धावा करून समद बाद झाला. दुसरीकडे क्लासेनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याला अकिल होसेनची साथ मिळाली. क्लासेनने 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
दोन्ही संघाचे खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक